पिकअपने दुचाकीला ठोकरल्याने बालिका गंभीर
बांदा
बांदा उड्डाणपूला खाली श्रीराम चौकात बोलेरो पिकअपने दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाला. यात दुचाकीवरील पती, पत्नी सह लहान मुलगी रस्त्यावर कोसळली. त्यात छोट्या मुलीला दुखापत झाली. जखमीना रुग्णवाहिकेतून बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनास्थळी स्थानिकांनी गर्दी केली असून बांदा पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातग्रस्त बोलेरो चौकातून हायवेवर येत होती. तर दुचाकी हायवेवरून जात होती. स्थानिकांनी तात्काळ जखमीना रुग्णालयात दाखल केले.

