डायलिसिस सुविधांचा विस्तार :
दोडामार्ग व वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात लवकरच मशीन कार्यान्वित
सावंतवाडी,
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दोन नवीन डायलिसिस मशीन कार्यान्वित करण्यात आली असून, याच धर्तीवर दोडामार्ग आणि वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयातही प्रत्येकी दोन डायलिसिस मशीन लवकरच कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती आमदार दीपक केसरकर यांनी दिली. सावंतवाडीत नव्याने बसवण्यात आलेल्या यंत्रांचा लोकार्पण सोहळा केसरकर यांच्या हस्ते पार पडला.
या कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख संजू परब, महिला जिल्हाप्रमुख नीता कविटकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमामुळे स्थानिक रुग्णांना डायलिसिससाठी अन्यत्र प्रवास करावा लागणार नाही, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

