You are currently viewing मिठी…

मिठी…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मिठी…*

 

वाट पाहते केव्हा पासून, थकून गेली दिठी

ऐन थंडीत तुमची सांगा ,केव्हा मिळेल मिठी

माघा मधला प्रहर रात्रीचा

किती हिव आलं भरास

दंवात भिजले अंगण सारे

पण इथे तुम्ही नाही घरास

चहाडखोर तो उनाड वारा, कसा मारतो शिटी

ऐन थंडीत तुमची सांगा , केव्हा मिळेल मिठी

फुलून आला चंद्र आभाळी

अन लुकलुक करती तारे

अंगाशी हे धसमुस करती

किती शहारणारे वारे

वाऱ्या संगे दारीं येऊन, हळूच काढा खिटी

ऐन थंडीत तुमची सांगा, केव्हा मिळेल मिठी

फुलून गेली जास्वदी अन

बहर चमेलीला आला

शेवतीच्या रंगांसोबत

मत्त मोगरा घमघमला

दर्वळणाऱ्या गंधा सोबत तुम्हा धाडते चिठी

ऐन थंडीत तुमची राया, केव्हा मिळेल मिठी

 

श्रीनिवास गडकरी

रोहा पेण पुणे

9130861304

@ सर्व हक्क सुरक्षित

प्रतिक्रिया व्यक्त करा