*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मातीचा राजा….मित्र माझा..!*
काळ्या मातीचा राजा
होता अगदी साधाभोळा
मित्र माझा जिवाभावाचा
वागायला जरासा वेंधळा…
वास्तवाचं जिणं जगला
तुकड्यांत वाटत गेला
खिळला भरडला काळ्यामातीत
चरणांत तुडवला गेला..
अंगावर व्यहवारी ओझं
काढायचा मातीतून सोनं
पावसाचं.. ऊन झेललं
शेतात लटकवली मान..
नात्याची औपचारिकता कधीच
राजाने बाळगली नाही
काळ्यामाईचा जपला अभिमान
मान झुकवली नाही..
मित्राच्या निष्पाप अंगणात
पेटत नाही पणती
तुझा..या मित्राला अभिमान
ओवाळावी राजापुढे आरती…!!
सलाम मित्रा…धन्यवाद ..
बाबा ठाकूर धन्यवाद
मित्र दिनानिमित्त माझ्या शेतकरी
मित्राला ही काव्यांजली अर्पण
ठाकूरी उवाच..दोन ✌

