*31 ऑगस्ट हा भटके विमुक्त दिवस म्हणून साजरा करण्यात येणार राज्य शासनाचा निर्णय भटके विमुक्तांसाठी अभिमानास्पद*
*महायुती सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष तथा रत्नागिरी जिल्हा प्रभारी नवलराज काळे.*
*महायुतीच्या सरकारमध्ये देशात नरेंद्र मोदी साहेब, राज्यात देवेंद्र फडवणीस साहेब व कोकणात नारायण राणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली भटके विमुक्त ओबीसी समाजाला न्याय मिळेल -नवलराज काळे यांनी व्यक्त केला विश्वास*
*सिंधुदुर्गनगरी*
सन 1871 साली ब्रिटिश सरकारने क्रिमिनल ट्रॅप ॲक्ट अंतर्गत काही जातींना गुन्हेगार जाती म्हणून घोषित केले त्यामुळे या जातींमध्ये समाज बांधवांना स्वातंत्रपूर्व काळात अमानुष अत्याचार सहन करावा लागला स्वातंत्र्यानंतरही हा समाज मुख्य प्रवाहापासून दूर राहिल्याने भटक्या व विमुक्त समाजाला न्यायासाठी विलंब झाला पर्यायाने या दीर्घकालीन सामाजिक परिणाम या समाजावरती झाले स्वातंत्र्यानंतर 31 ऑगस्ट 1952 रोजी क्रिमिनल ट्रॅप ॲक्ट हा कायदा रद्द करण्यात आला आणि या जातींना विमुक्त जाती म्हणजेच मुक्त झालेल्या म्हणून घोषित करण्यात आले. भटके विमुक्त समाज महाराष्ट्र राज्याच्या व देशाच्या प्रगतीमध्ये आपले योगदान देत आहेत भटके विमुक्त समाजाचे स्वातंत्र्यातील व राष्ट्र उभारणीतील योगदान लक्षात घेऊन त्यांच्या स्मरणार्थ 31 ऑगस्ट हा दिवस भटके विमुक्त दिवस म्हणून साजरा करण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. व महाराष्ट्र राज्यातील महायुतीच्या सरकारने 31 जुलै 2025 रोजी अखेर 31 ऑगस्ट हा दिवस भटके विमुक्त दिवस म्हणून साजरा करण्यासाठीचा शासन निर्णय जारी करून या निर्णयाची घोषणा केली. हा निर्णय महाराष्ट्र राज्यातील भटके विमुक्तांसाठी अभिमानास्पद आहे.
सदर शासन निर्णयामध्ये भटके विमुक्त हा दिवस राज्यस्तरावर व जिल्हा स्तरावर साजरा करण्यात यावा सदर दिवशी भटक्या विमुक्त समाजाच्या संस्कृतीचे जीवनमूल्य परंपरा दर्शवणारे विविध संस्कृती शैक्षणिक व माहितीपर उपक्रम राबविण्यात यावे शासकीय व अनुदानित आश्रम शाळा शासकीय वस्तीग्रह या ठिकाणी विद्यार्थी आरोग्य तपासणी शिबिर आधार कार्ड नोंदणी जातीचे दाखले जात वैधता प्रमाणपत्रासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांविषयी माहिती या करिता शिबिराचे आयोजन करावे. विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या विभागातील जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय मध्ये सदर कार्यक्रम आयोजित करण्याबाबत आवश्यक त्या सूचना निर्गमित करून त्याच्या अंमलबजावणी बाबत योग्य ती कार्यवाही करावी. 31 ऑगस्ट या दिवशी सार्वजनिक सुट्टी,साप्ताहिक सुट्टी (शनिवार रविवार) आणि स्थानिक सुट्टी असली तरीही या दिवशी भटके विमुक्त दिवस साजरा करावा असा उल्लेख केला आहे.
महायुतीचे सरकार भटके विमुक्तांसाठी विविध योजना राबवत आला आहे येणाऱ्या काळामध्ये भटके विमुक्तांसाठी मोठ्या प्रमाणात महायुतीचे सरकार काम करेल असा विश्वास भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष तथा रत्नागिरी जिल्हा प्रभारी श्री नवलराज काळे यांनी व्यक्त केला आहे.
राज्य सरकारने घेतलेला निर्णय हा भटके विमुक्तांच्या येणाऱ्या पिढींना आदर्श घडवून आनेल सर्व समाज बांधवांनी या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे व 31 ऑगस्ट 2025 रोजी भटके विमुक्त दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करावा असे आवाहन श्री काळे यांनी केले. महायुती सरकारमध्ये कोकणात नारायण राणे साहेब राज्यात देवेंद्र फडणवीस साहेब आणि देशात नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली भटके विमुक्त ओबीसी समाजाला न्याय मिळेल असा विश्वास देखील नवलराज काळे आणि व्यक्त केला आहे
श्री नवलराज काळे यांनी कोकण सहित संपूर्ण महाराष्ट्रातील भटके विमुक्त समाज बांधवांच्या वतीने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहित मंत्रिमंडळातील सर्वच मंत्री गण व सर्व आमदार व महायुती सरकारचे आभार मानले आहेत.

