दोडामार्गमध्ये ‘सांस्कृतिक लोककला मंच’तर्फे १४ सप्टेंबरला खुली नृत्य आणि सुगम संगीत स्पर्धा –
उदयोन्मुख कलाकारांना व्यासपीठ
दोडामार्ग (जि. सिंधुदुर्ग)
सांस्कृतिक लोककला मंच, दोडामार्ग (नोंदणी क्र. F-0005475, सिंधुदुर्ग) यांच्या वतीने महाराष्ट्र आणि गोवा राज्यमर्यादित खुली वैयक्तिक नृत्य स्पर्धा आणि सुगम संगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हे स्पर्धात्मक आयोजन रविवार, १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता श्री देव खंडोबा सभागृह, सरगवे पुनर्वसन, ता. दोडामार्ग येथे होणार आहे.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश उदयोन्मुख कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर एकाच वेळी दोन्ही स्पर्धा सुरू होतील.
🕺 नृत्य स्पर्धा पारितोषिके:
प्रथम पारितोषिक: ₹५,०००/- + आकर्षक ट्रॉफी व सन्मानपत्र
व्दितीय पारितोषिक: ₹३,०००/- + ट्रॉफी व सन्मानपत्र
तृतीय पारितोषिक: ₹२,०००/- + ट्रॉफी व सन्मानपत्र
प्रवेश फी: ₹३००/-
🎤 सुगम संगीत गायन स्पर्धा पारितोषिके:
प्रथम पारितोषिक: ₹५,०००/- + ट्रॉफी व सन्मानपत्र
व्दितीय पारितोषिक: ₹३,०००/- + ट्रॉफी व सन्मानपत्र
तृतीय पारितोषिक: ₹२,०००/- + ट्रॉफी व सन्मानपत्र
नोंदणीची अंतिम तारीख: रविवार, ३१ ऑगस्ट २०२५
(संयोजकांनी तांत्रिक कारणास्तव आवश्यक ते बदल करण्याचा अधिकार राखून ठेवलेला आहे.)
🌟 विशेष आकर्षण:
कार्यक्रमात नामवंत गायक, वादक, मिमिक्री आर्टिस्ट यांचा सहभाग असलेली सुरेल मैफल आयोजित करण्यात आली आहे. नाट्यगीत, भावगीत, भक्तिगीत आणि मराठी गीतांचा नजराणा या संगीतमय सायंकाळीत सादर केला जाईल.
अधिक माहिती व संपर्क:
अध्यक्ष: श्री. शंकर मधुकर जाधव – ९७६३३७९३०६ / ९४२३५१५०११
सचिव: श्री. सागर लक्ष्मण नाईक – ७५९७६९६३७४
उपाध्यक्ष: श्री. गंगाराम जानू गुळेकर – ८८०५९६७३४९
खजिनदार: श्री. महेश अर्जुन पारधी – ९४२१२६५८९६
सल्लागार: श्री. संजय तुकाराम सुतार – ८७८८३९९७६९
सहसचिव: श्री. विलास श्रीधर आईर – ८६५७६९१५७०
आर्थिक मदतीसाठी GPay नंबर: 9763379306
आयोजक: सांस्कृतिक लोककला मंच, दोडामार्ग

