You are currently viewing हुमरमळा (वालावल) गावातील सखीग्रामसंघाच्या सदस्य व सिआरपी राजीनामा देणार – माजी सरपंच सौ अर्चना बंगे

हुमरमळा (वालावल) गावातील सखीग्रामसंघाच्या सदस्य व सिआरपी राजीनामा देणार – माजी सरपंच सौ अर्चना बंगे

हुमरमळा (वालावल) गावातील सखीग्रामसंघाच्या सदस्य व सिआरपी राजीनामा देणार – माजी सरपंच सौ अर्चना बंगे

कुडाळ

सखी ग्रामसंघाची सर्वसाधारण सभा बोलावून मार्गदर्शन करण्याची मागणी करुनही दुर्लक्ष करण्यात आला असुन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा उदय पाटील यांनी आदेश देऊनही त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याने या पुढे हुमरमळा वालावल गावातील सखी ग्रामसदस्य उमेदशी संलग्न न रहाता स्वतंत्र कारभार करतील असे हुमरमळा वालावल मा सरपंच सौ अर्चना बंगे यांनी सांगितले
सौ बंगे बोलताना पुढे म्हणाल्या सखी ग्रामसंघाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा घ्यावी अशी मागणी आपण जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री उदय पाटील यांच्या कडे केली त्यांनी तालुका व्यवस्थापक उमेद आणि जिल्हा व्यवस्थापक श्री वालावलकर यांना पत्र देऊन सभा घेण्याचे आदेशही दीले परंतु ही सभा आज पर्यंत घेण्यात आली नाही हे खेदजनक असुन गेले चार महीने सखी ग्रामसंघाला एका विशिष्ट प्रकाराने वेठीस धरून भांडणे लावण्याचा प्रकार सुरू असुन या त्रासाला सीआरपी पण कंटाळलेले असल्याने या पुढे उमेदशी संलग्न हुमरमळा वालावल गावातील महीला बचत गट रहाणार नसुन येत्या दोन दीवसात राजीनामे देणार आहोत असे सौ बंगे यांनी सांगुन हुमरमळा वालावल गावातील महीला बचत गट एकोप्याने काम करत होते परंतु माझ्या वर राजकारणाचे आरोप होऊन माझ्या गावातील महीलांना भडकवीण्याचे काम होत होते म्हणुनच माझ्या गावातील माझ्या महीलांनी घेतलेला हा एकमुखी निर्णय आहे असे सांगून सौ बंगे म्हणाल्या वरीष्ठांच्या आदेशाला जर तालुक्यातील अधिकारी केराची टोपली दाखवत असुन आम्हाला नगण्य समजत असाल तर आम्ही उमेदशी संलग्न का राहायचे असा सवाल करत सौ बंगे यांनी सखी ग्रामसंघाच्या सदस्य राजीनाम्यावर ठाम असल्याचे सांगितले

प्रतिक्रिया व्यक्त करा