*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*अधीर मन झाले*
तुला भेटण्या
अधीर मन झाले
डोळ्यात जमले
ढग….
बघ कसा
श्रावण आला भरून
सृष्टी सजून
उभी…
झेलते मी
विरहाच्या तप्त ज्वाला
साजण आला
नाही….
थेंबांची टीपटीप
झाडाच्या पानातून कानावर
भावना अनावर
ह्रदयांत….
सांज कलली
काळोख दाटला भोवताली
आशा मावळली
भेटीची….
मोकळ्या कुंतली
शुभ्र जुईचा गजरा
गंधित हसरा
तुजसाठी…
साज शृंगार
तुझ्यासाठीच सर्व केला
दर्पणी नाचला
मनमोर….
ये सजणा
मन अधीर झाले
श्रावण झुले
तनामनात…..!!
🌷🍃🌿🌺🌿🌸🍀
अरुणा दुद्दलवार@✍️

