*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्या लेखक कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मधुमास श्रावण*
आला मधुमास श्रावण आला
सरसर सरसर श्रावण आला॥धृ॥
नाचत नाचत श्रावण आला
जलद नभांगणी उधळीत आला
आनंदाला उधाण लेऊन आला
सरसर सरसर श्रावण आला
कोकीळ स्वर स्वरात मिसळला
थुईथुई थुईथुई मोर नाचला
सागराला भेटून नटून आला
सरसर सरसर श्रावण आला
इंद्रधनुवर स्वार होऊन आला
मंगल तोरण बांधून आला
हिरवा बुट्टेदार शालू नेसून आला
सरसर सरसर श्रावण आला
पाने फुले फुलवीत आला
पशुपक्षी हसवीत आला
सण मांगल्याचा सजवीत आला
सरसर सरसर श्रावण आला
महादेवाला मिरवीत आला
भक्ती रसात भिजवीत आला
तना मनाला झुलवीत आला
सरसर सरसर श्रावण आला
आला मधुमास श्रावण आला
सरसर सरसर श्रावण आला॥धृ॥
कवी :-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे.*
7588318543.
8208667477.
