You are currently viewing इन्सुली घाटात भीषण अपघात

इन्सुली घाटात भीषण अपघात

इन्सुली घाटात भीषण अपघात:

कारने दिली दुचाकीला धडक, चालकासह तिघे जंगलात फरार

सावंतवाडी

इन्सुली घाटात आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून धडक देणारी कार रस्त्यावर सोडून चालक व दोघे साथीदार जंगलात पळून गेले. जखमीला तातडीने गोव्यातील बांबुळी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

अपघाताचा घटनाक्रम:
माडखोल येथील रहिवासी मंगेश सरदेसाई हे आपल्या दुचाकीवरून गोव्याला जात असताना इर्टिगा कारने सात जांभळी देवस्थानाजवळ त्यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर कारचालक दानिश सिद्दीकी (मूळ रा. मध्यप्रदेश, सध्या रा. गोवा) व त्याचे दोन साथीदार वाहन तिथेच सोडून जंगलात पळून गेले.

प्रवाशांची तत्परता, पोलिस तपास सुरू:
घटनास्थळी उपस्थित प्रवाशांनी जखमीला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी गोव्याच्या बांबुळी रुग्णालयात हलवण्यात आलं.

वाहतूक पोलिस मयुर सावंत यांनी घटनास्थळी धाव घेऊन कारच्या नंबरवरून मालकाचा शोध घेतला. चौकशीत हे स्पष्ट झालं की चालकाने मालकाची परवानगी न घेता गाडी वापरली होती. आता पोलिसांनी फरार दानिश सिद्दीकी व त्याच्या साथीदारांचा शोध सुरू केला असून गाडी मालकालाही चौकशीसाठी बोलावलं आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा