You are currently viewing जागतिक विक्रमवीर वागदेच्या कु.दुर्वांक गावडेचा शिवसेनेतर्फे युवानेते श्री.संदेश पारकर यांनी केला सत्कार..

जागतिक विक्रमवीर वागदेच्या कु.दुर्वांक गावडेचा शिवसेनेतर्फे युवानेते श्री.संदेश पारकर यांनी केला सत्कार..

कणकवली

कणकवली तालुक्यातील वागदे गावचा आठ वर्षाचा सुपुत्र कु.दुर्वांक गुरुदत्त गावडे याने अवघ्या 2 मिनिट 37 सेकंदात 200 हुन अधिक मानवी रोगजन्य विषाणूंची नावे न थांबता सांगण्याचा अनोखा जागतिक विक्रम करुन आपल्या बुद्धिचातुर्य आणि हुशारीची ओळख अख्या जगाला करुन दिली आहे.
या पराक्रमाची दखल घेऊन शिवसेनेतर्फे युवानेते श्री.संदेश पारकर यांनी कु.दुर्वांक गावडे याचा त्याच्या वागदे येथील निवासस्थानी जाऊन सत्कार केला आणि भावी वाटचालीस शुभेच्या दिल्या. यावेळी श्री.पारकर यांनी कु.दुर्वांक यांच्या आईवडिलांचे देखील कौतूक केले. भविष्यात लागेल ती मदत करण्याचे आश्वासन देखील यावेळी श्री.पारकर यांनी दिले.
यावेळी श्री.पारकर यांच्यासोबत माजी सभापती संदेश पटेल, माजी युवासेना जिल्हाप्रमुख अँड.हर्षद गावडे, कळसुली विभागप्रमुख रुपेश आमडोसकर, युवासेना तालुकाप्रमुख ललित घाडीगांवकर, वागदे माजी सरपंच मनीषा गावडे, दुर्वांकचे आईवडील उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × five =