कळणे विद्यालयात क्षयरोग मार्गदर्शन कार्यशाळा

कळणे विद्यालयात क्षयरोग मार्गदर्शन कार्यशाळा

दोडामार्ग

तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय दोडामार्ग अंतर्गत क्षयरोग, कुष्ठरोग अंतर्गत मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर मार्गदर्शक राजेश वाघाटे, शैलेशलोंढे, यु.के.गवस, सौ.बांबुळकर, मुख्या.महेंद्र देसाई व शिक्षक उपस्थित होते. यावेळी क्षयरोग होतो कसा, त्याची लक्षणे, कारणे व त्यापासून घ्यावयाची काळजी या संदर्भात मार्गदर्शन वजा विद्मार्थांशी चर्चा राजेश वाघाटे यांनी केली. तसेच कुष्ठरोग व तो कसा टाळता येईल, त्याचा संर्सग कसा कमी करता येईल या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शैलेश लोंढे यांनी केले. प्रास्ताविक श्री.देसाई यांनी केले. आभार श्री.धर्णे यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा