*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्या लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*
*माझी सत्ता माझी खुर्ची*
*एकाकडे पक्ष नाही तर*
*एकाकडे कडे सत्ता नाही*
*एकाच मुद्यावर दोघांनी*
*बडबडायच काहीबाही*
*एकत्र येऊन दोघं भी*
*काय काय करतील*
*गर्दीमध्ये नुसत्याच का*
*वराती नाचवतील*
*सांगा बर भाषेचा आदर*
*कोण बरं करतं*
*मराठी हिंदीच्या वादात*
*कुणाचं कुठे काय मुरतं*
*दोघी कडे ढोल वाजवून*
*सारखीच पोळी भाजायची*
*माझं खरं त्याच खोटं सांगून*
*कोपऱ्यात टाळी द्यायची*
*कोण चांगला कोण वाईट*
*कुणाचं काही कळत नसतं*
*पडद्या मागची हातमिळवणी* *
*कुणाला काय दिसत असतं*
*आपलं सद्ध्या साधून झाल्यावर*
*लोकांना फक्त जमवायचं*
*मुद्यावर गुद्दे मारून*
*फक्त भाषणात रंगवायचं*
*काय…….*
*संजय धनगव्हाळ*
*(अर्थात कुसुमाई)*
९४२२८९२६१८
९५७९११३५४७

