मुंबई-गोवा महामार्गावर अपघातात युवती गंभीर जखमी
बांदा
मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली खामदेव नाका येथे एका भरधाव ट्रकने धडक दिल्याने दिक्षा ज्ञानेश्वर नारुजी (२६, रा. बांदा पानवळ) ही युवती ट्रकखाली येऊन गंभीर जखमी झाली. तातडीने स्थानिकांनी तिला ट्रकखालून बाहेर काढून बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.
या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी घटनास्थळी ट्रकचालकाला जाब विचारत महामार्गावरील वाहतूक काही काळ रोखून धरली. या प्रकारामुळे मुंबई-गोवा महामार्गावर काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. हा अपघात रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास झाला.

