कामेरीतील माधुरी हत्तीण अंबानी अभयारण्यात हलवली;
गावकऱ्यांचा भावनिक उद्रेक, निषेधार्थ जीओ कार्ड दुसऱ्या कंपनीत पोर्ट
कामेरी गावातील ३६ वर्ष जैन मठात वास्तव्य करणारी प्रिय माधुरी हत्तीण अखेर गुजरातमधील अंबानी अभयारण्यात हलविण्यात आली. या घटनेने गावकऱ्यांमध्ये मोठा भावनिक उद्रेक झाला असून, सर्वांनी अश्रू ढाळत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला विरोध दर्शविला.
पेटा (PETA) या प्राणी संरक्षण संस्थेच्या हस्तक्षेपानंतर, माधुरी हत्तीणीची योग्य देखभाल न होत असल्याचे नमूद करत तिला अभयारण्यात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. तिच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने हे पाऊल गरजेचे असल्याचे कारण पुढे करण्यात आले.
मात्र गावकऱ्यांनी या निर्णयाचा तीव्र निषेध केला असून, त्यांनी एकत्र येत “जीओ” कंपनीचे मोबाईल कार्ड दुसऱ्या टेलिकॉम कंपनीत पोर्ट करण्याचा निर्णय घेतला. यामागे “माधुरीला परत आणा, तरच आम्ही जीओ कार्ड पुन्हा घेऊ” असा ठाम इशारा त्यांनी दिला आहे.
ही घटना भावनिक आंदोलनाचे प्रतीक ठरली असून, एका हत्तीणीबद्दलची प्रेमभावना किती खोलवर असू शकते, याचे हे उत्तम उदाहरण आहे.
धन्य ते कामेरी गाव, आणि धन्य ती माधुरी हत्तीण! 🙏🪷🌹

