अमरावती :
खानदेशातून यूपीएससी व एमपीएससी झालेल्या तसेच इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मिशन आयएएस गिरणा परिसर सत्कार सोहळा समन्वय समिती व पालक समिती धामणगाव तालुका चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सोहळा संपन्न झाला. दरवर्षी गिरणा परिसरातील वेगवेगळ्या गावांमध्ये मागील ८ वर्षांपासून असे कार्यक्रम घेतले जात आहेत.
या कार्यक्रमास मा. डॉ. उज्ज्वल कुमार चव्हाण (एक्स आयआरएस), ॲड मुंबई हायकोर्ट, मा श्री प्रकाश बाविस्कर उद्योजक व चेअरमन, बाविस्कर गृप मुंबई, मा श्री नरेशचंद्र काठोळे, संचालक मिशन आयएएस व राजेंद्र इंगोले उपाध्यक्ष मिशन आयएएस अमरावती यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रेरणादायी सोहळा पार पडला. यावेळी या वर्षी युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या धामणगावच्या सुकन्या श्रीमती मोहिनी सूर्यवंशी (आयपीएस), व यावल (आमोदा) येथील योगेश पाटील (आयआरएमएस) यांचा सत्कार करण्यात आला.
गावातील सुकन्या सौ. मोहिनी सूर्यवंशी यांनी युपीएससी मध्ये घवघवीत यश मिळवून आय पी एस पदावर निवड झाली, ही बाब धामणगाव व परिसरासाठी अत्यंत गौरवाची असून त्यांच्या प्रेरणादायी यशाचा याप्रसंगी बाविस्कर गृपचे चेअरमन श्री प्रकाश बाविस्कर यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात बृहन्मुंबईचे सहाय्यक अभियंता श्री श्रीकांत पायगव्हाणे यांचा देखील विशेष सत्कार करण्यात आला. एमपीएससी उत्तीर्ण श्री उदय खैरनार,(रोकडे), दिवाणी न्यायाधीश, श्री महेश देशमुख ,सहायक अभियंता,) कु सपना वाघ, दहिवद (सहायक अभियंता), श्री सुदर्शन चव्हाण , शिरसगाव (इमा बहुजन कल्याण अधिकारी), श्री संदेश पवार (भोरस पीएसआय), श्री तुषार निकम, दहिवद (कर सहायक), श्री अक्षय पाटील (खडकी), महसूल सहायक, श्रीमती ज्योती राठोड (कृष्णापुरी तांडा) यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. तसेच दहिवद, कळमडु, खडकी, मेहुनबारे, चिंचगव्हाण, दस्केबर्डी, पोहोरे असे परिसरातील १० ते १२ हायस्कुल मधील प्रथम क्रमांक उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा त्यांच्या आईवडीलांसोबत सत्कार सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावे, स्पर्धा परीक्षेविषयी योग्य मार्गदर्शन मिळावे तसेच परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या कर्तुत्वाचा सन्मान करावा, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी या निर्मळ भावनेतून हा सत्कार समारंभ आयोजित केला होता.
कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम लोकसहभागातून आयोजित करण्यात आला होता., दरवर्षी लोकसहभागातून च कार्यक्रम आयोजित केला जातो. एमपीएससी उत्तीर्ण झालेल्यांना आरंभ अधिकारी चाळीसगाव गृप मधील अधिकाऱ्यांमार्फत सन्मान पत्रे व प्रथम क्रमांक उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ट्रॉफी व विद्यार्थ्यांना नाश्त्याची सोय करण्यात आली होती. मिशन आय ए एस अमरावतीतर्फे चाळीसगावचे सुपुत्र श्री अभिषेक कासोदे व भुसावळचे उद्योजक श्री मनोहर जाधवानी यांच्यातर्फे युपीएससी उत्तीर्ण उमेदवारांना मिशन आय ए एस सन्मान पत्रे व सर्व विद्यार्थ्यांना शिवचरित्रे ही पुस्तके भेट म्हणून देण्यात आली. पालक समितीतर्फे मंडप, साउंड सिस्टीम, बॅनर, पत्रके व इतर गोष्टींची सोय करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री योगेश पाटील यांनी तर आभार प्रदर्शन श्री एस पी मोरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी श्री एस पी मोरे मुख्याध्यापक मा. वि. धामणगाव व सर्व शिक्षक वृंद, गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा समिती, पालक समिती सदस्य, पाणी समिती, यांनी परिश्रम घेतले. परिसरातील शिक्षणप्रेमी नागरिक, विद्यार्थी, पालक व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यानी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घेतला.
प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे संचालक
मिशन आय ए एस
अमरावती कॅम्प
9890967003

