“मोतिबिंदू मुक्त महाराष्ट्र” विशेष मोहिमेला जिल्ह्यात सुरुवात
सिंधुदुर्गनगरी
राज्यामध्ये २२ जुलै ते २२ ऑगस्ट २०२५ या कालावधीत सर्व जिल्ह्यामध्ये “मोतिबिंदू मुक्त महाराष्ट्र” या विशेष मोहिमेची सुरुवात झाली असून जिल्ह्यात २२ जुलै २०२५ रोजी जिल्हा रुग्णालयाच्या नेत्र विभाग येथे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्या हस्ते मोहिमेचे शुभारंभ करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्याम पाटील तसेच नेत्रशल्य चिकित्सक डॉ. बी.एस.जोशी, डॉ.सुबोध इंगळे, डॉ. तुषार चिपळुणकर, अनिलकुमार देसाई आदी उपिस्थित होते.
या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील मोतिबिंदू रुग्णांवर, मोफत उपचार केले जाणार आहेत. या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट मोतिबिंदुच्या रुग्णांचे वेळीच निदान करणे, रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करणे, अंधत्व रोखणे, ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत सेवा पोहचिणे आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी जिल्ह्यातील मोतिबिंदुग्रस्त रुग्णांना जवळच्या शासकीय रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जाऊन नेत्रचिकित्या अधिकाऱ्यांकडून नेत्रतपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक यांनी केले आहे.

