You are currently viewing “दारूच्या बाटल्यांचा हार घालून मनसेचा उपरोधिक संताप!

“दारूच्या बाटल्यांचा हार घालून मनसेचा उपरोधिक संताप!

“दारूच्या बाटल्यांचा हार घालून मनसेचा उपरोधिक संताप! –

कुडाळमध्ये धीरज परब यांचा उत्पादन शुल्क विभागाला थेट इशारा”

कुडाळ

कुडाळ तालुक्यात सुरु असलेल्या अवैध दारू विक्रीविरोधात मनसेने आज तीव्र आंदोलन करत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारभारावर उपरोधिक पद्धतीने निशाणा साधला. मनसेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज उत्पादन शुल्क विभागाच्या कुडाळ येथील कार्यालयात धडक दिली. यावेळी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या गळ्यात गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्यांचा हार घालून निष्क्रियतेचा तीव्र निषेध करण्यात आला.

धीरज परब यांनी यावेळी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, “मला हलक्यात घेऊ नका!” गेल्या चार महिन्यांपासून अवैध दारू विक्रीविरोधात प्रशासनाला माहिती देऊनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाची कार्यक्षमता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

या आंदोलनादरम्यान अवैध दारू विक्रेत्यांची सुधारित यादी विभागाला पुन्हा सादर करण्यात आली. सात दिवसांत कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

धीरज परब यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर, तालुकाध्यक्ष हेमंत जाधव, उपाध्यक्ष जगन्नाथ गावडे, गजानन राऊळ, अविनाश अणावकर, विभाग अध्यक्ष प्रथमेश धुरी, शाखा अध्यक्ष अनिकेत ठाकूर तसेच इतर महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या आंदोलनामुळे कुडाळ तालुक्यातील अवैध दारू विक्रीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, संबंधित विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा