*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*चांदणे पौर्णिमेचे*
लक्ख चांदण्यात भिजताना
आज शब्दच हे निःशब्द कां ?
शीत भावशब्द गीतातले
कधीतरी तू जाणशील कां ?
चांदवा आतुर पौर्णिमेचा
तू आतातरी पाहशील कां ?
जगणेच हे जाहले भावुक
सांग तुजविण सुंदर असेल कां ?
निरभ्र आसमंती तुझी प्रतिमा
कधी जीव हा विसरेल कां ?
लक्ख चांदण्यात भिजताना
आज शब्दच हे निःशब्द कां ?
———————————
*वि.ग.सातपुते.*

