*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम अष्टाक्षरी रचना*
आला धुंदीत श्रावण!
धुंदलेला हा श्रावण
सवे देखणा नजारा
आला धुंदीत श्रावण
ओला फाया मृद्गंधाचा
चिंब चिंब तनमन
धुंद करतो श्रावण
कोसळत्या जलधारा
सवे फुलतो निसर्ग
वाहे चैतन्याचा झरा
हिरवाई चोहीकडे
पर्णी सोनकवडसे
इंद्रधनु व्योमकेशी
पृथा सरीत न्हातसे
दृष्य गवत फुलांचे
विवीधता बहुरंगी
फिटे पारणे डोळ्यांचे
मनमोही बहुढंगी.
भ्रमरांचा गुंजारव
कलरव पक्षीगणी
झुळझुळ सरीतेची
लागे गोडगोड कर्णी
लयलूट सणांची हो
मजा खाद्य पदार्थांची
धुंदी आनंद मोदाची
आणि प्रेमवर्षावाची
चराचरी प्रसन्नता
श्रावणाचे होते गाणे
मनी आनंद उल्हास
गाऊ लागे हो तराणे
सौ.मंजिरी अनसिंगकर नागपूर.
