You are currently viewing वेंगुर्ले येथील जिल्हास्तरीय भव्य बुद्धिबळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

वेंगुर्ले येथील जिल्हास्तरीय भव्य बुद्धिबळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

वेंगुर्ले :

 

वेंगुर्ले नगर वाचनालय येथे शिवसेनेच्या वतीने रविवारी जिल्हास्तरीय भव्य बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा शुभारंभ सचिन वालावलकर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी आयोजित कार्यक्रमांस शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहरप्रमुख उमेश येरम, जिल्हा संघटक सुनील डुबळे, माजी सभापती सुनील मोरजकर, युवक शहरप्रमुख संतोष परब, महिला शहर अध्यक्षा ऍड. श्रद्धा बाविस्कर, अल्पसंख्यांक अध्यक्षा शबाना शेख, ज्येष्ठ खेळाडू बी. आर. तानावडे, बळीराम आडेलकर, दाभोलकर सर, अभि वेंगुर्लेकर, संदीप परब, विजू पालकर, पंच कौस्तुभ पेडणेकर आणि श्रीकृष्ण आडेलकर आदी यावेळी उपस्थित होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील स्पर्धक मोठया संख्येने सहभागी झाले होते.

वालावलकर यांनी कार्यक्रमात “मंत्री दिपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्षे आपण सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. यापुढील कालावधीत वेंगुर्ले शहर आणि तालुक्यासाठी खूप काम करावयाचे आहे. मी कोणी साहेब नसून सामान्य कार्यकर्ता आहे. सर्वांचे मिळत असलेले प्रेम अजून काम करण्याची प्रेरणा देते,” असे सांगून आजच्या जिल्हास्तरीय स्पर्धे बरोबरच वेंगुर्ले शहरात लवकरच राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा घेण्यासाठी निश्चित प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही वालावलकर यांनी दिली.

यावेळी उपस्थित सर्व मान्यवर मंडळींनी सचिन वालावलकर यांच्या कामाचे कौतुक करून पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात सचिन वालावलकर यांचा उपस्थित पदाधिकारी यांच्या वतीने केक कापून वाढदिवस आणि सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संतोष परब यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा