You are currently viewing खोपोली नगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयाचे सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण

खोपोली नगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयाचे सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण

खोपोली :

खोपोली नगरपालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयाने ५० वर्षे पूर्ण केली याबद्दल सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे स्नेह संमेलन दिनांक २३ जुलै रोजी रूग्णालयातील सभागृहात आयोजित करण्यात आले. उपस्थित ज्येष्ठ कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

श्रीमती गीता कुरूप, सौ. जेसी बालन, सौ. माधुरी वैद्य डिसोजा या परिचारिकांचा तसेच राधा मावशी, मधु सोलंकी, या कर्मचाऱ्यांचा डॉक्टर संगीता वानखेडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी रुग्णालयाच्या इंचार्ज सिस्टर तायडे- कोजगे सिस्टर, स्टाफ नर्स राखी गिरी, पाचरणे सिस्टर, डॉ किसवे सर, डॉ विश्वकर्मा मॅम, ऋतुजा फार्मासिस्ट, भोजराज चौधरी HIV समुपदेशक, काजल नाईक HIV तंत्रज्ञ, जोशी लेखनिक, सिस्टर प्रांजल, वंदना, वृषाली, राजश्री व ललित मावशी, दाई मीना, लतिका व सरोज, डोंगरे मामा, स्वप्नील, विनोद, राम, सुनील, सागर, आंदळे, विनायक, बिरहाडे मामा, विजय, आशा वर्कर विमल, मुमताज व वैशाली आदी सर्व कर्मचारी व डॉ प्रमोद वानखेडे उपस्थित होते.

सर्वच कर्मचाऱ्यांनी स्नेह संमेलन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा