*केंद्रशाळा शेर्पेच्या विद्यार्थ्यांना देणगीतून दप्तर ,रेनकोट व वृक्षलागवडीसाठी कुंड्यांचे मोफत वाटप*
कणकवली
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा शेर्पे , तालुका कणकवली या शाळेला गेले तीन वर्ष सेवा सहयोग फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दप्तर व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येते ,सन 2025 जूनमध्येच या संस्थेमार्फत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत दप्तर व शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला .या संस्थेकडे दप्तरे व आवश्यक शैक्षणिक साहित्य मिळवण्यासाठी पत्रव्यवहार व पाठपुरावा शाळेचे मुख्याध्यापक दशरथ शिंगारे यांनी एप्रिल महिन्यापासूनच केला होता .तसेच या शाळेचे माजी विद्यार्थी ज्योती तेली आणि त्यांचे मित्र मंडळ ,निशा गुरव -माजी सरपंच शेर्पे ,विनोद शेलार -पोलीस पाटील शेर्पे ,सिराज मुजावर -उपसरपंच शेर्पे ,यांनीही सदरची देणगी मिळवण्यासाठी पाठपुरा केलेला आहे .त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक दशरथ शिंगारे यांची फेसबुक पोस्ट वाचून वाशी मुंबई येथील संदीप कुलकर्णी यांनी केंद्रशाळा शेर्पे या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचे 45 विद्यार्थ्यांना रुपये 28000 / – किंमतीचे रेनकोट व 50 वृक्षारोपणासाठी कुंड्या शाळेला दिलेल्या आहेत .सदर देणगी वितरणाचा कार्यक्रम केंद्रशाळा शेर्पे या शाळेमध्ये रवींद्र जठार माजी सभापती वित्त बांधकाम जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या शुभहस्ते संपन्न झाला .यावेळी स्मिता पांचाळ -सरपंच शेर्पे,सिराज मुजावर -उपसरपंच शेर्पे ,’सायली पांचाळ – ग्रामपंचायत सदस्य शेर्पे ,निशा गुरव – सरपंच शेर्पे विनोद शेलार -पोलीस पाटील,शाळेचे मुख्याध्यापक – दशरथ शिंगारे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष – सत्यविजय शेलार ,उपाध्यक्ष -प्रताप राऊत ,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य – मंगेश कांबळे , समीर मुजावर ,साक्षी तेली ,वैष्णवी पवार’ , जान्हवी सावंत ,मानसी कदम ,स्वरा पाटणे ,विलास पांचाळ,विजय राऊत व शिक्षक वृंद -सखाराम खरात ,तुषार तांबे ,आर्या कुलकर्णी , पौर्णिमा भागवडे , पालक वविद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . . याप्रसंगी रवींद्र जठार म्हणाले -विद्यार्थ्यांना आता शासन गणवेश , पुस्तके , बूट इत्यादी साहित्य देत आहे . तसेच या शाळेमध्ये शाळेचे मुख्याध्यापक दशरथ शिंगारे यांच्या प्रयत्नातून शाळेच्या विद्यार्थ्यांना दप्तरे मिळाले आहेत .शैक्षणिक साहित्य मिळाले आहे .रेनकोट मिळालेले आहेत .झाडे लावण्यासाठी कुंड्या मिळालेल्या आहेत .विद्यार्थ्यांनो तुम्हाला मिळालेल्या साहित्याची तुम्ही यादी करत रहा .आणि ज्या देणाऱ्याने उदात्त भावनेने ही ह्या वस्तू तुम्हाला दिलेले आहेत ही तुमच्यासाठी प्रेरणा आहे .ही प्रेरणा तुम्ही तुमच्या उरामध्ये ठेवून तुम्ही सुद्धा असेच देणारे व्हा !हा सुंदर विचार तुमच्या जीवनामध्ये तुमच्या अंतर्मनामध्ये बिंबवा .तसेच विशेष कौतुक सन्मा. संदीप कुलकर्णी यांचे केले की , कोणत्याही प्रकारची ओळख नसताना सुद्धा शिंगारे गुरुजींच्या एका फेसबुक पोस्टवर एवढी मोठी देणगी देणे हे सोपे काम नाही आणि एवढी विश्वासार्हता गुरुजींनी प्राप्त करणे हे मोठे काम आहे त्याबद्दल देणगीदारांचे आणि देणगी मिळवण्यासाठी प्रयत्न करणारे या शाळेचे मुख्याध्यापक शिंगारे गुरुजी अभिनंदन करतो .तसेच या शाळेचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे अशाच प्रकारचे शैक्षणिक नवीन नवीन उपक्रम या शाळेने राबवावेत .आणि ज्या ज्या वेळेला सहकार्य लागेल ते या शाळेला निश्चितच दिले जाईल अशा प्रकारची ग्वाही दिली .कार्यक्रम प्रसंगी निशा गुरव माजी सरपंच शेर्पे , स्मिता पांचाळ सरपंच शेर्पे यांनीही शाळेच्या उपक्रमांचे विशेष कौतुक केले .देणगीदारांचे आणि देणगी मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मुख्याध्यापक शिंगारे गुरुजी यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा पर मार्गदर्शन केले .संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक -शाळेचे मुख्याध्यापक दशरथ शिंगारे यांनी केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन -उपक्रमशील शिक्षक तुषार तांबे यांनी केले .तर आभार प्रदर्शन -सखाराम खरात यांनी केले .कार्यक्रम यशस्वीतेसाठी आर्या कुलकर्णी , पोर्णिमा भागवडे ,प्रज्ञा शेलार मानसी शेलार.व विद्यार्थी प्रतिनिधी व सर्व विद्यार्थी यांनी विशेष मेहनत घेतली .

