रोट्रॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडीच्या अध्यक्षपदी सिद्धेश सावंत…
सचिवपदी अवधूत राणे, उपाध्यक्षपदी भावेश भिसे तर खजिनदारपदी कुणाल सावंत..
सावंतवाडी
रोट्रॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडीच्या नवीन कार्यकारिणीची निवड नुकतीच पार पडली. यात अध्यक्षपदी सिद्धेश सावंत, सचिवपदी अवधूत राणे, उपाध्यक्षपदी भावेश भिसे तर खजिनदारपदी कुणाल सावंत यांची निवड झाली आहे.
तसेच विहंग गोठोस्कर, पृथ्वीराज चव्हाण,मिहिर माठकर, नितेश मठकर, श्रिया माठकर, निकिता आराबेकर, विनायक कुडतरकर, शुभम सावंत,शिवम सावंत, सानिका गावडे, सौजन्या पवार, सुकन्या पवार, मेहुल रेडीज, आदित्य नाईक, प्रतीक मडगावकर, श्रद्धा गावठे, पूर्वा निर्गुण, सायली गावठे यांची कार्यकारणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उद्या सायंकाळी ४.३० वाजता रोटरी ट्रस्ट सभागृह, सावंतवाडी येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन रोट्रॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडीचा मावळत्या अध्यक्षा निकिता आराबेकर यांनी केले आहे.
