You are currently viewing आम. निलेश राणेंची सावंत कुटुंबीयांना सांत्वनपर भेट

आम. निलेश राणेंची सावंत कुटुंबीयांना सांत्वनपर भेट

सावंतवाडी :

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जिल्हा बँकेचे माजी संचालक शिक्षण महर्षी विकासभाई सावंत यांचे अलीकडेच निधन झाले होते. या पार्श्वभूमीवर कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी विकासभाई यांचे सुपुत्र विक्रांत सावंत यांना भावनिक धीर दिला. तसेच सावंत कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले.

कै. विकास भाई सावंत यांचे राजकीय, सामाजिक, सहकार व शैक्षणिक क्षेत्रातील कार्य फारच मोठे होते. त्यांच्या रूपाने एक जवळचा मार्गदर्शक हरपला, अशा शब्दांत आ. निलेश राणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, शिवसेना पदाधिकारी विनोद सावंत, युवा सेनेचे पदाधिकारी ओमकार सावंत, निखिल सावंत, संकल्प धारगळकर तसेच राजू राणे व रामदास निलख यांच्यासह सावंत कुटुंबीय उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा