You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन दुर्मीळ वनस्पतींचा शोध. प्रा. डॉ. विजय पैठणे यांचे संशोधन

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन दुर्मीळ वनस्पतींचा शोध. प्रा. डॉ. विजय पैठणे यांचे संशोधन

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन दुर्मीळ वनस्पतींचा शोध.
प्रा. डॉ. विजय पैठणे यांचे संशोधन

वैभववाडी,
दि.२४/७/२०२५

सिंधुदुर्ग जिल्हा हा निसर्गसंपत्तीने समृद्ध आहे. आजवर येथे सुमारे ११५० ते १२०० हून अधिक वनस्पतींची नोंद झाली आहे. परंतु याच जिल्ह्यातून आणखी तीन दुर्मीळ वनस्पतींचा शोध नुकताच लावण्यात आला आहे. हे संशोधन केवळ सिंधुदुर्गच्या नव्हे, तर महाराष्ट्राच्या वनसंपदेसाठीही मोठे योगदान ठरणार आहे. वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. विजय आश्रुबा पैठणे आणि त्यांच्या विद्यार्थी २०१५ पासून सिंधुदुर्गच्या वनसंपत्तीचा सखोल अभ्यास करीत आहेत. विद्यार्थ्यांना आपल्या गावातील झाडांबद्दल अधिक जाणून घ्या, त्यांचे फोटो काढा, शास्त्रीय नावे शोधा, उपयोग समजा, अशी प्रेरणा देत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी आत्मियता आणि संशोधनाची रुची वाढते. या उपक्रमातूनच ही दुर्मीळ वनस्पती शोध मोहीम सुरू झाली.
संशोधनातील दुर्मीळ वनस्पती
Kaemferia rotunda L. (भुईचाफा)
भारतामध्ये या प्रजातीच्या ८ प्रकार आढळतात. महाराष्ट्रात या वनस्पतीचा आधी फक्त पुणे परिसरात उल्लेख होता. परंतु F.Y.B.Sc. (Botany) ची विद्यार्थिनी कु. सारिका विलास बाणे हिला कणकवली तालुक्यातील शिवडाव गावात ही दुर्मीळ वनस्पती आढळली. २५ वर्षांनंतर कोकणात या वनस्पतीचा पुन्हा शोध लागला आहे. या संशोधनाचा गौरव “Applied Research in Life Sciences” (जून २०२५, अहमदाबाद) या आंतरराष्ट्रीय पुस्तकात करण्यात आला आहे.
Staurogyne glutinosa (Wall. ex C.B.Clarke) Kuntze (चिकट मत्स्याक्षी)
तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनी कु. योगेश्री केळकर हिने सोनाळी गावात ही वनस्पती शोधली. ओळख पटवण्यासाठी प्रा. पैठणे यांची मदत घेतली असता लक्षात आले की महाराष्ट्रात याआधी हिची नोंद नव्हती. भारतात या प्रजातीच्या १४ प्रकारांपैकी दोन फक्त महाराष्ट्रात होत्या. ही वनस्पती पूर्वी बिहार, केरळ, ओरिसा, उत्तर प्रदेश या राज्यांत होती. आता महाराष्ट्रातही हिची भर पडली आहे. हे संशोधन “Journal of Economic Taxonomic Botany” (सप्टेंबर २०२४, राजस्थान) या नामांकित जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे.
Hyptis capitata Harley (‘गाठी तुळस’ किंवा ‘रान तुळस’)
कुडाळ तालुक्यातील हुमरमाळा गावातील डोनर या भागात प्रा. पैठणे यांच्या वनस्पती सर्वेक्षणात ही वनस्पती आढळली. पूर्वी या वनस्पतीची नोंद फक्त आंदमान-निकोबार, केरळ, त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि गोवा (मोलेम नॅशनल पार्क) येथे होती. महाराष्ट्राच्या वनसंपदेत या प्रजातीची ही पहिली नोंद ठरली आहे. हे संशोधन “International Journal of Advance Research” (एप्रिल २०२४, इंदोर, मध्यप्रदेश) मध्ये प्रकाशित झाले आहे.
या तीन्ही वनस्पतींचे शुष्क नमुने आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्या ‘हर्बेरियम’ मध्ये ठेवलेले आहेत. यामुळे भविष्यातील अभ्यासकांना या दुर्मीळ वनस्पती थेट पाहता येतील. या यशस्वी संशोधनाची दखल महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, भाजपाचे महामंत्री आदरणीय विनोदजी तावडे यांनी घेतली आहे. त्यांनी कु. सारिका बाणे आणि डॉ. विजय पैठणे यांचे कौतुकपर पत्र पाठवले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संस्थेचे कोषाध्यक्ष श्री.अर्जुन रावराणे, विश्वस्त गणपत दाजी रावराणे, शरद रावराणे, स्थानिक समितीचे सचिन प्रमोदजी रावराणे यांनी विद्यार्थिनी व प्राध्यापक यांचा महाविद्यालयात सत्कार व अभिनंदन केले.शोध हा थांबत नाही, तो पुढील पिढ्यांना दिशा देतो.सिंधुदुर्गसारख्या निसर्गसंपन्न जिल्ह्यात विद्यार्थी आणि शिक्षकांनी मिळून वनसंपत्तीचा केलेला हा अभ्यास संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.
संपर्कासाठी:
जिल्ह्यातील निसर्गप्रेमी, अभ्यासक किंवा वनस्पतीविषयी अधिक जाणून घेऊ इच्छिणाऱ्यांनी प्रा. विजय पैठणे (८०१०३२६४२२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

______________________________
*संवाद मीडिया*

*Edubroad Education and Career Guidance Center Pvt Ltd.*

*Education & Career Guidance Center*

*_परदेशात शिक्षणाचं योग्य मार्गदर्शन_*

*📚 परदेशात शिकण्यासाठी संधी – पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम*

*🔹 पदव्युत्तर (मास्टर्स) अभ्यासक्रम*

*व्यवसाय व कायदा: MBA, बिझनेस स्टडीज, लॉ*

*इंजिनिअरिंग व संगणक: इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स*

*आरोग्य विषय: MDS, DDS, MPH*

*कला, डिझाईन, मीडिया: आर्किटेक्चर, आर्ट्स, डिझाईन, मिडिया*

*फार्मसी व विज्ञान: सायन्स, फार्मसी*

*🔹 पदवी (UG – अंडर ग्रॅज्युएट) अभ्यासक्रम*

*वैद्यकीय क्षेत्र: MBBS, BDS, नर्सिंग, हेल्थ सायन्स*

*इंजिनिअरिंग व संगणक: बी.ई., कॉम्प्युटर सायन्स*

*व्यवसाय व कायदा: बिझनेस, लॉ*

*कला व डिझाईन: आर्ट, डिझाईन, मीडिया, म्युझिक*

*इतर खास अभ्यासक्रम: हॉटेल मॅनेजमेंट, टुरिझम, स्पोर्ट्स, फार्मसी, कॉस्मेटिक सायन्स, एज्युकेशन*

*🔹 डिप्लोमा व कमी कालावधीचे कोर्सेस*

*बिझनेस, मॅनेजमेंट*

*इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी*

*नर्सिंग, पब्लिक हेल्थ*

*फार्मसी, फिजिओथेरपी*

*हॉटेल मॅनेजमेंट, कुकिंग*

*🔹 Ph.D. साठी परदेशी संधी*

*इंजिनिअरिंग*
*मॅनेजमेंट*
*फार्मसी*

*🌍 ज्या देशांमध्ये शिकण्यासाठी संधी आहे*

*_UK | USA | जर्मनी | कॅनडा | फ्रान्स | इटली | ऑस्ट्रिया | नेदरलँड | जॉर्जिया | आर्मेनिया | रशिया | लिथुआनिया | कुरासाओ_*

*🩺 MBBS परदेशात का करावा?*

*दर्जेदार शिक्षण, मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीज*

*खर्च पारदर्शक आणि योग्य*

*ॲडमिशनपासून व्हिसा आणि नंतरच्या सोयींपर्यंत संपूर्ण मदत*

*UK, USA, जर्मनी, जॉर्जिया, रशिया, इ. देशांत उपलब्ध*

*👩‍⚕️ नर्सिंग करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी – जर्मनी*

*योग्यता:*

*वय: १८–३६ वर्ष*

*शिक्षण: B.Sc नर्सिंग किंवा GNM*

*फ्रेशर्स व अनुभवी दोघांनाही संधी*

*फायदे:*

*€2900 पर्यंत पगार (महिना)*

*४० तास आठवड्याचे काम*

*जोडीदार आणि मुलांसाठी डिपेंडंट व्हिसा*

*३ वर्षांनंतर PR साठी अर्ज करता येतो*

*आमचा एक वर्ष संपूर्ण सपोर्ट मिळेल*

*⭐ आमचं वैशिष्ट्य (USPs):*

*✅ ॲडमिशन ते परदेशात पोहोचेपर्यंत पूर्ण मार्गदर्शन*
*✅ परदेशात शिक्षण घेतलेले अनुभवी तज्ज्ञ*
*✅ अभ्यासक्रम तुमच्या बजेट आणि आवडीप्रमाणे*
*✅ युरोपमध्ये विशेष मार्गदर्शन (Germany, Italy, etc.)*
*✅ विद्यार्थी व नोकरदारांसाठी खास करिअर काउंसिलिंग*
*✅ स्कॉलरशिप, एज्युकेशन लोन, जॉब सर्च, पीआर मार्गदर्शन*

*🧭 आमच्या सेवा*

*प्रोफाइल तपासणी व सुधारणा*

*योग्य युनिव्हर्सिटी निवड*

*ॲडमिशनसाठी मदत*

*व्हिसा अर्जात सहाय्य*

*शिष्यवृत्ती व शैक्षणिक कर्ज मार्गदर्शन*

*विमान प्रवासापूर्वी व पोहोचल्यावर मदत*

*परदेशात नोकरी शोधण्यासाठी मार्गदर्शन*

*📍 संपर्क करा*

*📌 कोल्हापूर ऑफिस*
Shop No. S-1, ज्युपिटर कमर्शियल कॉम्प्लेक्स, ग्राउंड फ्लोअर, ताराबाई पार्क, कोल्हापूर – 416003
*📞 +91-9209468279*

*📌 सिंधुदुर्ग ऑफिस*

शर्वाणी कॉम्प्लेक्स, कुडाळ हायस्कूल जवळ, कुडाळ, सिंधुदुर्ग 416520
*📞 +91-8928612362*

*👤 संस्थापक: श्री. राहुल नाईक* (M.S. Germany)

*📞 +91-8308950156*

*📧 ईमेल: education@edubroad.in*
*🌐 वेबसाइट: www.edubroad.in*

*तुमचं स्वप्न, आमचं मार्गदर्शन – परदेशी शिक्षणासाठी*
*एड्युब्रॉड तुमच्या सोबत*

*Advt link 👇*
https://sanwadmedia.com/177865/
______________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा