You are currently viewing कवी प्रा. डॉ सुशिल सातपुते साहित्य लीला काव्यप्रतिभा पुरस्काराने सन्मानित 

कवी प्रा. डॉ सुशिल सातपुते साहित्य लीला काव्यप्रतिभा पुरस्काराने सन्मानित 

ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकांत दादा वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली काव्यसंमेलन व पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

 

पुणे : लीला साहित्य प्रकाशन, काषाय प्रकाशन आणि दै.साहित्य लीला पंढरी यांच्या संयुक्त विद्यमानाने गुरूपौर्णिमा निमित्त गुरूवार दि.१० जुलै २०२५ रोजी पहिले काव्यसंमेलन व पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. ज्येष्ठ साहित्यिक मा चंद्रकांतदादा वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी मा.नरेंद्र व्यवहारे ( मा.अध्यक्ष शिक्षण मंडळ , पुणे मनपा), मा शिरिष खेर (मुख्य संचालक) यांची विशेष उपस्थिती होती. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा. शिल्पाताई कुलकर्णी ( ज्येष्ठ साहित्यिक), मा.विनोद सावंत (सुप्रसिद्ध गझलकार) आणि मा विजयकुमार पांचाळ ( सुप्रसिद्ध कवी,लेखक, समीक्षक) होते. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकांतदादा वानखेडे यांनी केलेल्या सर्व प्रेरणादायी कार्याची दखल घेऊन तयार केलेल्या मानपत्राचे अभिवाचन कवयित्री सौ. सुनिता कपाळे यांनी केले. गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुवर्य मा.चंद्रकांतदादा आणि आदरणीय पौर्णिमा माई यांचे गुरुपूजन करण्यात आले. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सुप्रसिद्ध कवियत्री विद्या अटक यांच्या ‘अलकांजली’ या अलकसंग्रहाचा प्रकाशन सोहळा पार पडला झाला. या कार्यक्रमात साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक मा. सिमा झुंजाराव, ज्येष्ठ साहित्यिक मा.प्रकाश पाठक यांना गुरूवर्य चंद्रकांतदादा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुप्रसिद्ध कवयित्री सुनिताताई कपाळे (छत्रपती संभाजीनगर), सुप्रसिद्ध कवी,लेखक प्रा. डॉ सुशिल सातपुते ( लातूर) आणि सुप्रसिद्ध कवियत्री नंदा कोकाटे ( ठाणे) यांना साहित्य लीला काव्यप्रतिभा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कवी प्रा. डॉ सुशिल सातपुते यांच्या ‘ध्यास’ या काव्यसंग्रहासाठी हा पुरस्कार देण्यात आला. ध्यास हा काव्यसंग्रह २०२४ या वर्षी प्रकाशित झाला आहे. हा कार्यक्रम ओक संकुल सभागृह , शनिवार पेठ पुणे येथे पार पडला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजीका मा. वनिता चौधरी यांनी केले. या राज्यस्तरीय काव्यसंमेलन व पुरस्कार वितरण सोहळ्याचे बहारदार सुत्रसंचालन सुप्रसिद्ध कवियत्री सौ.राजश्री मराठे वाणी यांनी केले. ज्येष्ठ साहित्यिक प्रा . चंद्रकांतदादा वानखेडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, साहित्य लीला पंढरीचे कार्य तळागाळातील माणसाच्या हृदयापर्यंत पोहोचत आहे. महाराष्ट्रातील नामवंत कवी कवयित्री यांनी उत्कृष्ट रचना सादर करत रसिकांची मने जिंकली.

डॉ सुशिल सातपुते यांना यापूर्वी साहित्य क्षेत्रातील बंधुता प्रकाशयात्री , बंधुता काव्य प्रतिभा पुरस्कार, काव्य प्रतिभा पुरस्कार मिळाला आहे. आतापर्यंत अनेक जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय कविसंमेलनातुन कविता सादरीकरण केले आहे. तसेच प्रातिनिधिक काव्यसंग्रह, दिवाळी अंक, साप्ताहिक, वर्तमानपत्रातुन कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे २०२४ या वर्षी गणेश उत्सव, नवरात्र उत्सव, कोजागिरी पौर्णिमा निमित्त विविध ठिकाणी समाज प्रबोधनात्मक काव्यमैफिलीचे आयोजन तसेच सुत्रसंचालन केले आहे . तसेच अनेक साहित्यिक, शैक्षणिक कार्यक्रमाचे निवेदन केले आहे. परभणी, छत्रपती संभाजीनगर येथील आकाशवाणी वरून शैक्षणिक, साहित्यीक कार्यक्रमाचे प्रसारण देखील झाले आहे. डॉ.सुशिल सातपुते सध्या छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था कृषि महाविद्यालय, कांचनवाडी, छत्रपती संभाजीनगर येथे कृषीविद्या विभागात, सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. या काव्यमहोत्सव व पुरस्कार वितरण सोहळ्याचे यशस्वी आयोजन दै.साहित्य लीला पंढरीच्या संपादिका वनिता चौधरी यांनी केले होते. प्रा. डॉ सुशिल सातपुते यांना पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अनेक स्तरातून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा