You are currently viewing कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथील सिटीस्कॅन मशिनचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ

कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथील सिटीस्कॅन मशिनचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ

कणकवली :

उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथील महाराष्ट्र शासन व कृष्णा डायग्नोस्टीक यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत सीटी स्कॅन सेंटरचे लोकार्पण सोहळा राज्याचे मत्स्योदयोग आणि बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील, प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, डॉ.श्याम पाटील, तुषार चिपळूणकर, औषध निर्माता अधिकारी अनिलकुमार देसाई, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पूजा काळजी, बँक संचालिका प्रज्ञा ढवण, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, डॉ.विद्याधर तायशेटे, अण्णा कोदे, संजय कामतेकर, कळसुली सरपंच सचिन पारधीये, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, विजय चिंदरकर, राजन परब आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा