नापणे येथे काचेच्या पुलाचे भव्य उद्घाटन
पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पूल नागरिकांसाठी खुला
नापणे वैभववाडी
नापणे धबधब्याच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या काचेच्या पुलाचे उद्घाटन राज्याचे पालकमंत्री श्री. नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले. या पुलामुळे स्थानिक पर्यटनाला चालना मिळणार असून, तो आजपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे.
या पुलाचे बांधकाम गव्हरमेंट कॉन्ट्रॅक्टर श्री. बबन हळदिवे यांचे सुपुत्र गणेश हळदिवे आणि श्री. मुणगेकर यांनी पूर्ण केले आहे. उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री नितेश राणे यांनी दोघांचाही सत्कार केला आणि त्यांच्या कामाचे कौतुक केले.
उद्घाटन सोहळ्यात बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले, “ही वास्तू आपली आहे. आपण सर्वांनीच ती जपली पाहिजे. देवगड, वैभववाडी आणि कणकवली या मतदारसंघात पर्यटन वाढवण्यासाठी सरकारकडून भरघोस निधी दिला जाईल.”
यावेळी अजित नाडकर्णी यांनीही मंत्री राणे यांचे अभिनंदन करत या भव्य प्रकल्पाबद्दल समाधान व्यक्त केले.
कोट्यवधी रुपयांच्या खर्चातून उभारलेला हा काचा पूल पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार असून, निसर्गरम्य नापणे धबधब्याचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांची आता अधिक गर्दी होण्याची शक्यता आहे.
