You are currently viewing मळगाव भूतनाथ मंदिराचा जत्रौत्सव उत्साहात संपन्न

मळगाव भूतनाथ मंदिराचा जत्रौत्सव उत्साहात संपन्न

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून भाविकांना दर्शन

सावंतवाडी
मळगाव येथील जागृत देवस्थान श्री देव भूतनाथ मंदिराचा वार्षिक जत्रौत्सव शनिवारी उत्साहात व भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमावलीचे पालन करून हा जत्रौत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त मंदिरात धार्मिक विधी, सायंकाळपासून देवाला केळी-नारळ ठेवणे, नवस बोलणे- फेडणे, तसेच ईठला देवीची ओटी भरणे आदी कार्यक्रम झाले. तर रात्री ढोलांच्या गजरात तरंगासहीत पालखी मिरवणूक काढण्यात आली.

त्यानंतर रात्री मळगाव व सोनुर्ली गावच्या प्रसिध्द दशावतारी कलाकरांचा संयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. या नाट्यप्रयोगात संजय जोशी, नारायण आसयेकर, नितीन आसयेकर, रत्नाकर मांजरेकर, प्रथमेश मळगावकर, रमेश शिरोडकर, संतोष गावकर, मुकुंद परब, चेतन राऊत, साईल तळकटकर, शुभम देऊलकर, ओंकार नवार, रामचंद्र शेटकर, खेमराज पोपकर, अनंत ठाकूर, साहील गावकर आदी कलाकारांनी आपली कला सादर केली. तर त्यांना हार्मोनियम-संजय पालकर, पखवाज-निलेश मांजरेकर, तालरक्षक- समीर मांजरेकर संगीतसाथ केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 + five =