You are currently viewing “९ कोटींच्या पाणी योजनेने देवगडच्या विकासाला गती” – पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही

“९ कोटींच्या पाणी योजनेने देवगडच्या विकासाला गती” – पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही

“९ कोटींच्या पाणी योजनेने देवगडच्या विकासाला गती” – पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही

देवगड
देवगड-जामसंडे परिसरातील नागरिकांना वारंवार भेडसावणाऱ्या पाणीपुरवठा अडचणींवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी दहिबांव नळपाणी योजनेच्या पाईपलाइन दुरुस्ती कामाचा शुभारंभ मंगळवारी पार पडला. यासाठी तब्बल ९ कोटी २१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

जामसंडे वेळवाडी सडा येथे उभारण्यात आलेल्या ६.५ लाख लिटर क्षमतेच्या साठवण टाकीचे लोकार्पण आणि दुरुस्ती कामाच्या भूमिपूजन सोहळ्याला राज्याचे मत्स्योद्योग मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे प्रमुख उपस्थित होते.

राणे म्हणाले, “महायुती सरकारमध्ये निधी कमी पडणार नाही. देवगडचा विकास वेगाने करायचा आहे. हे काम गुणवत्तापूर्ण व वेळेवर पूर्ण होईल यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष ठेवावे.”

या योजनेमुळे देवगड-जामसंडे भागातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेसाठी निधी तातडीने मंजूर करून दिल्याबद्दल राणे यांनी त्यांचे आभार मानले.

कार्यक्रमास माजी आमदार अ‍ॅड. अजित गोगटे, नगराध्यक्षा साक्षी प्रभू, मुख्याधिकारी गौरी पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष राजा भुजबळ यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋत्विक धुरी यांनी केले तर आभारप्रदर्शन शरद ठुकरूल यांनी केले. यावेळी साठवण टाकीसाठी जागा देणाऱ्या मालवणकर कुटुंबीयांचा विशेष सत्कार करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा