वाकड, चिंचवड-
पोस्टल काॅलनी वाकड, येथे सांस्कृतिक कार्यक्रम समिती अंतर्गत महिला मंडळ विभागातर्फे शनिवार दिनांक 19 जुलै 2025 रोजी सकाळी सात वाजता राम मंदिर (ओमेगा पॅराडाईज जवळील) विठ्ठल रुक्माई नामस्मरण फेरी काढण्यात आली.
श्री राम पूजन होऊन त्यानंतर नामस्मरण फेरी काढण्यात आली.यामध्ये मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग होता.नामस्मरण फेरीमध्ये महिलांनी टाळ मृदुंगासह जय जय राम कृष्ण हरी हरी विठ्ठलच्या गजरात,भजन-रिंगण घालत,पावली फुगडी खेळत संपन्न झाली.राम मंदिरामध्ये परत फेरी आल्यानंतर सर्वांनी मिळवून आरती केली त्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आले .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आनंद जेष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी श्री बोरकर आणि श्री माधव बह्राटे यांच्यासह सांस्कृतिक समिती सदस्य श्री श्रीकांत रेवणवार,श्री रामचंद्र कळमकर,तारामन कलाटे,अलका कळमकर,सौ चित्रा बह्राटे,सौ मीरा बोरकर,सौ पुष्पा धवळे, सौ निर्मला झोपे,सौ वैशाली नेवलकर,श्री नेवलकर,श्री बळीराम झोपे,श्री सोनबा बुवाडे,एकनाथ श्री चौधरी आणि योगा वर्गातील महिला यांनी उत्स्फूर्त पणे सहभाग नोंदवला.
आनंद जेष्ठ नागरिक संघाचे प्रसिद्धी प्रमुख श्री अशोक बोंडे आणि सौ हेमांगी बोंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
