नापणे धबधब्यावरील काचेच्या पुलाचे उद्या उद्घाटन
जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती
राज्यातील पहिला काचेचा पुल पर्यटकांसाठी होणार खुला
वैभववाडी
नापणे धबधबा येथे उभारण्यात आलेल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन मंगळवार दि. २२ रोजी दुपारी १२ वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर अधिकृतरित्या पर्यटकांसाठी हा पुल खुला करण्यात येणार आहे.
नापणे धबधबा या ठिकाणी शासनाच्या वतीने राज्यातील पहिला काचेचा पूल उभारण्यात आला आहे. सिंधू रत्न योजनेतून ९९ लाख रुपये इतका निधी खर्च करून हा पुल उभारण्यात आला आहे. सोशल मीडियावर या काचेच्या पुलाची माहिती प्रसिद्ध होताच मोठ्या संख्येने पर्यटकांनी नापणे येथे गर्दी केली होती. परंतु या पुलाचे १५ टक्के काम शिल्लक असल्याने गेले काही दिवस हा पुल प्रशासनाने बंद ठेवला होता. या पुलाचे काम आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे २२ जुलै रोजी या पुलाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. यावेळी बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी, वैभववाडी तहसीलदार तसेच पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
