स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचा कु.सोहम देशमुख सांगली येथील बुद्धिबळ स्पर्धेमध्ये ” बेस्ट इन महाराष्ट्र “.
सावंतवाडी
सांगली येथे रविवार दिनांक 20 जुलै 2025 रोजी पार पडलेल्या गुरुवर्य कुमार पांडुरंग माने स्मृती बुद्धिबळ महोत्सव 2025 या खुल्या गटातील स्पर्धेमध्ये स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचा कु. सोहम भारती सचिन देशमुख याने ” बेस्ट इन महाराष्ट्र ” गटामध्ये प्रथम क्रमांक मिळविला. या स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतातून 610 स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामध्ये खुल्या गटातून 178 स्पर्धकांमधून एकूण आठ फेऱ्यांमधून सोहमने 5.5 गुण प्राप्त करून “Best in Maharashtra ” या गटामध्ये प्रथम क्रमांक पटकाविला . सोहमला बक्षीस म्हणून सन्मान चिन्ह व रोख रुपये 400/- मिळाले.
