*’कविता हा साहित्याचा आत्मा!’ – राजन लाखे*
*’कवितेकडून कवितेकडे…’ साहित्य संमेलन संपन्न*
पिंपरी
‘कविता हा साहित्याचा आत्मा आहे!’ असे विचार महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे यांनी दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था सभागृह, पेठ क्रमांक २७, निगडी प्राधिकरण येथे रविवार, दिनांक २० जुलै २०२५ रोजी व्यक्त केले. नांदेड येथे संपन्न होणाऱ्या विसाव्या राज्यस्तरीय समरसता साहित्य संमेलनपूर्व एकदिवसीय ‘कवितेकडून कवितेकडे…’ या
संमेलनात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना राजन लाखे बोलत होते. ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे, विधानपरिषद आमदार उमा खापरे, महाराष्ट्र समरसता साहित्य परिषद कोषाध्यक्ष सुनील ढेंगळे, प्रांत संयोजक प्रा. डॉ. धनंजय भिसे, वन्यजीव अभ्यासक डॉ. सुधीर हसमनीस, समरसता साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष मानसी चिटणीस यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती; तसेच संमेलनात नीलेश गद्रे, विलास लांडगे, सुरेश जोशी, क्षितिज गायकवाड, राजेंद्र घावटे, राज अहेरराव, सुरेश कंक यांनी उपस्थिती दर्शवली.
उमा खापरे यांनी, ‘अहिल्यादेवी होळकर यांनी समाजासाठी आयुष्य समर्पित केले. राजकीय वारसा नसतानाही माझी कारकीर्द घडविण्यात संघ परिवाराचे योगदान आहे!’ अशी भावना व्यक्त केली. सुनील ढेंगळे यांनी, ‘संपूर्ण भारत देश हा साहित्याने जोडलेला आहे!’ असे मत मांडले. याप्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या विषयावरील जिल्हास्तरीय निबंधस्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. स्वरा देशमुख या विद्यार्थिनीने सादर केलेल्या ईशस्तवनानंतर आणि पंचमहापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. सुहास घुमरे यांनी प्रास्ताविकातून ‘नव्वदोत्तरी कविता’ या विषयावर संमेलन केंद्रित असल्याची माहिती दिली.
उद्घाटन सत्रानंतर डाॅ. वैशाली मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली ‘नव्वदोत्तरी कवितेतील स्थित्यंतरे’ या परिसंवादात अरुण बोऱ्हाडे (नव्वदोत्तरी कामगार कविता), अभिजित काळे (नव्वदोत्तरी गझल), मानसी चिटणीस (नव्वदोत्तरी ग्रामीण कविता) यांनी ऊहापोह केला. डाॅ. वैशाली मोहिते यांनी, ‘समाजाची गती, स्थिती, प्रयोजन जाणण्याचे साधन म्हणजे साहित्य होय!’ असे अध्यक्षीय मत मांडले. त्यानंतर ‘करम बहावा’ या सत्रात चिन्मयी चिटणीस, भालचंद्र कुलकर्णी, डाॅ. मंदार खरे, निरुपमा महाजन, प्राजक्ता वेदपाठक, मिलिंद छत्रे, वैशाली माळी यांनी पिवळ्या रंगाची वेषभूषा परिधान करून वैविध्यपूर्ण आशयविषयांच्या कवितांचे प्रभावी सादरीकरण केले. संमेलनाच्या अंतिम सत्रात प्रा. सुरेखा कटारिया यांच्या अध्यक्षतेखाली तसेच विनायक कुलकर्णी आणि आनंद हरी यांच्या प्रमुख उपस्थितीत सुमारे वीस निमंत्रित कवींनी बहारदार कवितांचे सादरीकरण करीत श्रोत्यांची दाद मिळवली.
जयश्री श्रीखंडे, पंजाबराव मोंढे, सीताराम सुबंध, राजेंद्र भागवत, कैलास भैरट, सुप्रिया लिमये, श्रद्धा चटप, स्नेहा पाठक, राजू जाधव, सुनीता बोडस, स्वाती भोसले, मंगला पाटसकर, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले. अनुक्रमे उज्ज्वला केळकर, हेमंत जोशी, वैजयंती आपटे, नीलेश शेंबेकर यांनी सूत्रसंचालन केले. पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
______________________________
*संवाद मीडिया*
*Edubroad Education and Career Guidance Center Pvt Ltd.*
*Education & Career Guidance Center*
*_परदेशात शिक्षणाचं योग्य मार्गदर्शन_*
*📚 परदेशात शिकण्यासाठी संधी – पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम*
*🔹 पदव्युत्तर (मास्टर्स) अभ्यासक्रम*
*व्यवसाय व कायदा: MBA, बिझनेस स्टडीज, लॉ*
*इंजिनिअरिंग व संगणक: इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स*
*आरोग्य विषय: MDS, DDS, MPH*
*कला, डिझाईन, मीडिया: आर्किटेक्चर, आर्ट्स, डिझाईन, मिडिया*
*फार्मसी व विज्ञान: सायन्स, फार्मसी*
*🔹 पदवी (UG – अंडर ग्रॅज्युएट) अभ्यासक्रम*
*वैद्यकीय क्षेत्र: MBBS, BDS, नर्सिंग, हेल्थ सायन्स*
*इंजिनिअरिंग व संगणक: बी.ई., कॉम्प्युटर सायन्स*
*व्यवसाय व कायदा: बिझनेस, लॉ*
*कला व डिझाईन: आर्ट, डिझाईन, मीडिया, म्युझिक*
*इतर खास अभ्यासक्रम: हॉटेल मॅनेजमेंट, टुरिझम, स्पोर्ट्स, फार्मसी, कॉस्मेटिक सायन्स, एज्युकेशन*
*🔹 डिप्लोमा व कमी कालावधीचे कोर्सेस*
*बिझनेस, मॅनेजमेंट*
*इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी*
*नर्सिंग, पब्लिक हेल्थ*
*फार्मसी, फिजिओथेरपी*
*हॉटेल मॅनेजमेंट, कुकिंग*
*🔹 Ph.D. साठी परदेशी संधी*
*इंजिनिअरिंग*
*मॅनेजमेंट*
*फार्मसी*
*🌍 ज्या देशांमध्ये शिकण्यासाठी संधी आहे*
*_UK | USA | जर्मनी | कॅनडा | फ्रान्स | इटली | ऑस्ट्रिया | नेदरलँड | जॉर्जिया | आर्मेनिया | रशिया | लिथुआनिया | कुरासाओ_*
*🩺 MBBS परदेशात का करावा?*
*दर्जेदार शिक्षण, मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीज*
*खर्च पारदर्शक आणि योग्य*
*ॲडमिशनपासून व्हिसा आणि नंतरच्या सोयींपर्यंत संपूर्ण मदत*
*UK, USA, जर्मनी, जॉर्जिया, रशिया, इ. देशांत उपलब्ध*
*👩⚕️ नर्सिंग करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी – जर्मनी*
*योग्यता:*
*वय: १८–३६ वर्ष*
*शिक्षण: B.Sc नर्सिंग किंवा GNM*
*फ्रेशर्स व अनुभवी दोघांनाही संधी*
*फायदे:*
*€2900 पर्यंत पगार (महिना)*
*४० तास आठवड्याचे काम*
*जोडीदार आणि मुलांसाठी डिपेंडंट व्हिसा*
*३ वर्षांनंतर PR साठी अर्ज करता येतो*
*आमचा एक वर्ष संपूर्ण सपोर्ट मिळेल*
*⭐ आमचं वैशिष्ट्य (USPs):*
*✅ ॲडमिशन ते परदेशात पोहोचेपर्यंत पूर्ण मार्गदर्शन*
*✅ परदेशात शिक्षण घेतलेले अनुभवी तज्ज्ञ*
*✅ अभ्यासक्रम तुमच्या बजेट आणि आवडीप्रमाणे*
*✅ युरोपमध्ये विशेष मार्गदर्शन (Germany, Italy, etc.)*
*✅ विद्यार्थी व नोकरदारांसाठी खास करिअर काउंसिलिंग*
*✅ स्कॉलरशिप, एज्युकेशन लोन, जॉब सर्च, पीआर मार्गदर्शन*
*🧭 आमच्या सेवा*
*प्रोफाइल तपासणी व सुधारणा*
*योग्य युनिव्हर्सिटी निवड*
*ॲडमिशनसाठी मदत*
*व्हिसा अर्जात सहाय्य*
*शिष्यवृत्ती व शैक्षणिक कर्ज मार्गदर्शन*
*विमान प्रवासापूर्वी व पोहोचल्यावर मदत*
*परदेशात नोकरी शोधण्यासाठी मार्गदर्शन*
*📍 संपर्क करा*
*📌 कोल्हापूर ऑफिस*
Shop No. S-1, ज्युपिटर कमर्शियल कॉम्प्लेक्स, ग्राउंड फ्लोअर, ताराबाई पार्क, कोल्हापूर – 416003
*📞 +91-9209468279*
*📌 सिंधुदुर्ग ऑफिस*
शर्वाणी कॉम्प्लेक्स, कुडाळ हायस्कूल जवळ, कुडाळ, सिंधुदुर्ग 416520
*📞 +91-8928612362*
*👤 संस्थापक: श्री. राहुल नाईक* (M.S. Germany)
*📞 +91-8308950156*
*📧 ईमेल: education@edubroad.in*
*🌐 वेबसाइट: www.edubroad.in*
*तुमचं स्वप्न, आमचं मार्गदर्शन – परदेशी शिक्षणासाठी*
*एड्युब्रॉड तुमच्या सोबत*
*Advt link 👇*
https://sanwadmedia.com/177865/
______________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

