You are currently viewing न्याय देवता

न्याय देवता

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

 *”न्याय देवता”* 

 

न्यायदेवतेचा उगम प्राचीन काळापासून

सत्यमेव जयते होत आरोपींना शासनIIधृII

 

न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी आहे बोधचिन्ह

व्यक्ती सामाजिक दर्जा संपत्ती नाही पहात

न्याय निष्पक्ष देत विना दडपण भेदाभेदII1II

 

एका हातात राहे तराजू न्याय समतोलत

पुराव्यांचे करी परीक्षण दोन्ही बाजूं समजून

सहनशील निरागस सृजन स्त्री दैवतII2II

 

दुसऱ्या हातात आहे तलवार संविधान

न्याय होई प्रस्थापित दोषींना मिळे शासन

संविधानानुसार न्याय मिळण्याचे प्रयोजनII3II

 

शनि देवाला न्यायदेवता मानतात सर्वत्र

व्यक्तीला कर्मा नुसार होई योग्य फळ प्राप्त

सर्व गोष्टींना न्याय प्रायश्चित्त आहे हिंदू धर्मातII4II

 

कर्म न्यायाचे लेखपाल यमधर्म चित्रगुप्त

मनुष्याचे मृत्यूनंतर पाठवे स्वर्ग नरकांत

काळभैरव ठेवी वाईट शक्तीवर नियंत्रणII5II

 

दुर्गादेवी न्यायदेवता करी न्याय प्रस्थापित

गोलू देवता आहे न्याय सत्य लोकदैवत

अय्यनार ग्रामदेवता करी न्याय धर्म रक्षणII6II

 

श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा