You are currently viewing आरोंदा रेडकरवाडी येथे बिबट्याच्या हल्यात वासराचा मृत्यू

आरोंदा रेडकरवाडी येथे बिबट्याच्या हल्यात वासराचा मृत्यू

आरोंदा रेडकरवाडी येथे बिबट्याच्या हल्यात वासराचा मृत्यू

*बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी*

सावंतवाडी

आरोंदा रेडकरवाडी येथील शेतकरी श्री.विनायक अर्जुन रेडकर यांच्या घराशेजारील गुरांच्या गोठ्यात रात्री दीड वाजण्याच्या सुमारास बिबट्याने गाईच्या वासरावर हल्ला केला.यात या वासराचा मृत्यू झाला.
दिवसेंदिवस जंगले नष्ट होत असल्याने वन्य प्राणी आता मानवी वस्तीत येऊन पाळीव प्राणी,जनावरे,माणसांवर हल्ला करत आहेत.त्यामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आरोंदा रेडकरवाडी येथील श्री. अर्जुन रेडकर यांच्या वासरावर हल्ला झाल्याची घटना वनविभागाकडे कळविताच वनविभागाचे श्री. प्रकाश रानगिरे,श्री पडते घटनास्थळी दाखल होत, घटनेची माहिती घेत पंचनामा केला.यावेळी आरोंदा उपसरपंच श्री गोविंद ( आबा) केरकर, ग्रामपंचायत सदस्य श्री.सिद्धेश नाईक उपस्थित होते.
मात्र वारंवार या हल्ल्याच्या घटना घडत असल्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.त्यामुळे वनविभागाने तत्काळ या बाबतीत लवकरात लवकर वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत असून, संबंधित घटनेविषयी आपण वनविभागाला निवेदन देणार असल्याचे उपसरपंच श्री गोविंद केरकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा