*ज्येष्ठ लेखिका कवयित्री चित्रकारा, आदर्श शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कृष्णकमल*
कृष्णकमळ ,नील,रक्त,वर्णी
फुलून झुलते, खुलते हरितपर्णी
कौरवांचा ताफा चोहोबाजूंनी
पंचपांडवांची, मधेद्रौपदीसजणी.
त्रिकिंजले श्रीकृष्ण सुदर्शन चक्र,
हे वर्णन मानले जाते,
ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्रिदेव
कुणी भक्तीभावे मानते, पूजिते.
सुगंधिपुष्पा मनोभावे वंदिते
प्रभूची किमया, निसर्गाकार,
दैवाविष्कार अप्रुप घडविते
दाविते साक्षात्कार, चमत्कार.
स्वप्नगंधा सतीश आंबेतकर

