You are currently viewing जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्यासाठी 5 ऑगस्टपर्यत मुदवाढ

जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्यासाठी 5 ऑगस्टपर्यत मुदवाढ

जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्यासाठी 5 ऑगस्टपर्यत मुदवाढ

सिंधुदुर्गनगरी 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या मार्फत जिल्ह्यातील युवांनी केलेले समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य कारण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने प्रतिवर्षी जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येतो. सन 2024-25 साठी जिल्हा युवा पुरस्काराठी अर्ज सादर करण्यासाठी 5 ऑगस्टपर्यंत मुदवाढ देण्यात आली, असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी दिली आहे.

          राज्याचे युवा धोरण 2012 मधील शिफारशीच्या अनुषंगाने शासनाने जिल्हास्तरावरील युवा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतलेला आहे. जिल्हा युवा पुरस्कार तीन जणांना दिला जाणार आहे. यात युवक युवती व नोंदणीकृत संस्था यांचा समावेश असणार आहे. युवा अथवा नोंदणीकृत संस्थांनी ग्रामीण व शहरी भागात केलेले सामाजिक कार्य, समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती जमाती व जनजाती, आदिवासी भाग इ. बाबतचे कार्य, शिक्षण झोपडपट्टी, आपत्ती व्यवस्थान तसेच स्थानिक समस्या इ.बाबत पुरस्कार वर्षापसून गत तीन वर्षात केलेली कार्यकामगिरी या पुरस्कारांसाठी विचारात घेतली जाईल.

          अर्जदाराने अर्ज आवश्यक कागदपत्रे व केलेल्या कार्याचे सबळ पुरावे बंद लिफाफ्यामध्ये 5 ऑगस्ट 2025 पर्यंत कार्यालयात सादर करणे आवश्यक असणार आहे. अर्जाबाबत अधिक माहिती करीता संबंधित क्रीडा अधिकारी यांच्याशी कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुख्य प्रशासकीय इमारत, सिंधुदुर्गनगरी येथे कामकाजाच्या दिवशी संपर्क साधावा तसेच विहित मुदतीत प्रस्ताव अर्जदाराने या कार्यालयात सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा