You are currently viewing नागपुरात आयएएस झालेल्या मुलांचा सत्कार मराठा भिशी ग्रुपचा अभिनव उपक्रम 

नागपुरात आयएएस झालेल्या मुलांचा सत्कार मराठा भिशी ग्रुपचा अभिनव उपक्रम 

नागपुर :

महाराष्ट्रातील विशेषत: विदर्भातील आयएएस या परीक्षेतील टक्केवारी वाढावी व नागपूर विभागातील मुले मोठ्या संख्येने कलेक्टर व्हावीत यासाठी मराठा भिशी ग्रुप परिवाराने येत्या रविवार दिनांक 20 जुलै रोजी सकाळी दहा वाजता नागपूरच्या अजनी परिसरातील काँग्रेस नगर मधील सुप्रसिद्ध अशा धनवटे नॅशनल कॉलेजच्या विमलाबाई देशमुख सभागृहात एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अशा प्रकारचे आयएएस विद्यार्थ्यांचे सत्कार आयोजित करणारी ही नागपुरातील पहिली संस्था आहे.

ह्या आगळ्यावेगळ्या स्पर्धा परीक्षा कार्यशाळा व आयएएस विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्री भूषण गवई यांच्या मातोश्री व मा. लेडी गव्हर्नर प्राचार्य डॉक्टर कमलताई गवई ह्या अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नागपूरचे लोकप्रिय पोलीस आयुक्त श्री रवींद्र कुमार सिंगल यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर विभागाचे विभागीय कार्यालयातील अपर आयुक्त व सुप्रसिद्ध स्पर्धा परीक्षा तज्ञ व वक्ते श्री राजेश खवले व महाराष्ट्र शासनाच्या बहुजन समाजाच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या महाज्योतीचे उपसंचालक श्री प्रशांत वावगे यांना निमंत्रित केले आहे.

नागपूर शासकीय आयएएस केंद्रातून यावर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेले सर्वश्री जयकुमार आडे, श्रीरंग कावरे, राहुल आत्राम, सर्वेश बावणे, अपूर्वा बालपांडे, सौरभ यावले, नम्रता ठाकरे, सचिन बिसेन, भाग्यश्री नैकळे, श्रीतेज पटेल, शिवांग तिवारी, मोहिनी खंडारे व डॉ. अभय देशमुख यांना सत्काराचे निमंत्रण दिले आहे.

या सर्वांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र शासनाच्या नागपूर येथील शासकीय आय ए एस. केंद्राचे संचालक डॉ. प्रमोद लाखे सुप्रसिद्ध स्पर्धा परीक्षा तज्ञ व मिशन आय.ए एस.चे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे तसेच श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या काँग्रेस नगर येथील धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रशांत कोठे सर हे उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहावे अशी विनंती मराठा भिशी ग्रुप परिवारातर्फे करण्यात आली आहे.

 

प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे संचालक

मिशन आय.ए.एस.

अमरावती कॅम्प

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा