*🚩 अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग मार्फत पणदूर येथे १९ जुलै रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे आयोजन*
*🚩श्री सत्यवान रेडकर करणार मार्गदर्शन*
अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग मार्फत शिवाजी इंग्लिश स्कुल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पणदूर तिठा येथे शनिवार दिनांक १९ जुलै २०२५ रोजी दुपारी ठीक २.३० वाजता श्री सत्यवान यशवंत रेडकर यांच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
कोकणातील मुले दहावी, बारावी मध्ये उल्लेखनीय यश प्राप्त करतात, किंबहुना कोकण बोर्ड अस्तित्वात आल्यापासून संपूर्ण राज्यात कोकण बोर्ड पास होण्याच्या टक्केवारी मध्ये अव्वल असते. परंतु, पुढे जाऊन हीच हुशार मुले कुठे अडखळतात..? त्यांचे करिअरच्या उद्देशाने केवळ इंजिनिअर, डॉक्टर होणे एवढेच ध्येय असते का..? शासकीय अधिकारी म्हणून ही मुले का पुढे येत नाहीत..? त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही का..? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. त्यामुळे कोकणातील मुले देखील शासकीय अधिकारी बनून कोकणचे नाव रोशन करावे असे स्वप्न घेऊन कोकणचे सुपुत्र कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क श्री.सत्यवान यशवंत रेडकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांना शासकीय स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी नेहमी विनामूल्य मार्गदर्शन करत असतात.
सदर मार्गदर्शन वर्ग हा निशुल्क असून ९ वी ते १२ वी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, स्पर्धा परिक्षा देणारे विद्यार्थी यांनी या वर्गाचा लाभ घ्यावा असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाने केले आहे. सोबत येताना वही व पेन आणावे.
अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग अशाच प्रकारे विविध ठिकाणी शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षा चे अनुकूल वातावरण निर्मिती करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. प्रशासकीय व्यवस्थेत जास्तीत जास्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टक्का वाढावा यासाठी सदर शैक्षणिक मार्गदर्शन विविध ठिकाणी आयोजित केले जातील.
______________________________
*संवाद मीडिया*
👨🏻🎓🧑🏻🎓👨🏻🎓🧑🏻🎓👨🏻🎓🧑🏻🎓👨🏻🎓🧑🏻🎓👨🏻🎓🧑🏻🎓
*प्रवेश सुरू!! प्रवेश स्वरू!!!प्रवेश सुरू!!!*
*💊💊B.PHARMACY व D.PHARMACY 💊💊🧑🏻🎓👨🏻🎓शै. वर्ष 2025-26 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू👨🏻🎓🧑🏻🎓*
*फार्मास्युटिकल्सच्या जगात तुमची क्षमता अनलॉक करा! B.Pharmacy आणि D.Pharmacy प्रवेशासाठी आत्ताच नावनोंदणी करा आणि नावीन्यपूर्ण आणि आरोग्यसेवा उत्कृष्टतेच्या प्रवासाला सुरुवात करा. फार्मास्युटिकल उद्योगात तुमचे भविष्य सुरक्षित करा. आजच अर्ज करा!*
डिस्टिंक्टिव एज्युकेशन सोसायटी संचलित
*श्री रामराजे कॉलेज ऑफ फार्मसी, दापोली.*
*तालुका- दापोली, जिल्हा- रत्नागिरी*
(सलग्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,लोणारे आणि PCI-Delhi,DTE,MSBTE व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त )
*DTE CODE-03712*
*👉अभ्यासक्रम :*
*🔸️फार्मसी पदविका (D.Pharmacy)*
*Choice Code-0371282311)*
प्रवेश क्षमता- ६०
*पत्रता*-बारावी भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र अनिवार्य विषयामध्ये उत्तीर्ण आणि गणित किंवा जीवशास्त्र यापैकी एका विषयासह उत्तीर्ण.
*🔸️फार्मसी पदवी (B.Pharmacy)*
*Choice Code-0371282310)*
प्रवेश क्षमता- ६०
*पात्रता*- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित मध्ये ४०% गुणांसह बारावी उत्तीर्ण, सामान्य श्रेणीसाठी वर्गी / श्रेणी आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित किंवा भौतिकशास्त्, रसायनशास्त्र, जीवशास्त्र मध्ये ४५ गुण. MH-CET अनिवार्य आहे
*👉प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी खालील दिलेल्य मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून एकवेळ महाविद्यालयास अवश्य भेट द्या.🙏*
*संपर्क-*
*9420156771, 9145623747, 7887561247*
*पत्ता*- प्रांत ऑफिस जवळ,ता.दापोली , जि. रत्नागिरी
(कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.)
*Advt link 👇*
______________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
