*सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, वेंगुर्ला या शाळेचा दहावीचा निकाल 100%*
वेंगुर्ले
सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, वेंगुर्ला या
शाळेतून 36 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाळेचा निकाल 100% लागला. एकूण 36 विद्यार्थ्यांपैकी 33 विद्यार्थी विशेष प्रावीण्य मध्ये, 2 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 1 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाला.
सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, वेंगुर्ला या शाळेतील प्रथम आलेले तिन क्रमांक खालील प्रमाणे आहेत.
1) कु. संचिता विजय आंबेरकर 95.40%
2) दिया ज्ञानेश्वर देवजी 95%
3) भावी प्रसाद मराठे 91%
सर्व यशस्वी विद्यार्थांचे अभिनंदन संस्थेचे उपाध्यक्ष इर्शाद शेख, सचिव दत्तात्रय परूळेकर, संचालक प्रशांत नेरूरकर, मुख्याध्यापिका मनिषा डिसोजा, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे.