You are currently viewing मळेवाड येथील नवविवाहितेची माहेरी न्हावेली येथे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

मळेवाड येथील नवविवाहितेची माहेरी न्हावेली येथे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

मळेवाड येथील नवविवाहितेची माहेरी न्हावेली येथे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

सावंतवाडी :

मळेवाड येथील एका नवविवाहितेने माहेरी न्हावेली येथे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अक्षरा अक्षय नाईक (वय २६) असे या नवविवाहितेचे नाव असून, ती दोन महिन्यांपूर्वीच मळेवाड येथील अक्षय यांच्याशी विवाहबद्ध झाली होती. अक्षराचे माहेरचे नाव प्रतीक्षा परब होते. तिचा मृतदेह मंगळवारी सकाळी न्हावेली देऊळवाडी येथील घराशेजारील विहिरीत तरंगत्या अवस्थेत आढळला.

याबाबत अधिक माहिती अशी की, अक्षरा सोमवारी दुपारी आपल्या माहेरी न्हावेली येथे आली होती. घरातील सदस्य शेतीच्या कामासाठी बाहेर गेले असल्याने ती घरी एकटीच होती. सायंकाळी कुटुंबीय घरी परतल्यानंतर अक्षरा दिसली नाही, त्यामुळे त्यांनी तिचा शोध सुरू केला. रात्री उशिरापर्यंत तिचा शोध लागला नाही. आज मंगळवारी सकाळी तिचा मृतदेह घराशेजारील विहिरीत आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच न्हावेली पोलीस पाटील सावळाराम न्हावेलकर, उपसरपंच अक्षय पार्सेकर आणि ग्रामस्थ तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण आणि उपनिरीक्षक माधुरी मुळीक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

अक्षराचा तळवडे येथे टेलरिंगचा व्यवसाय होता. विशेषतः दशावतार नाट्य कलाकारांचे दशावतारी कपडे ती शिवून देत असे. तिच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे न्हावेली आणि मळेवाड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा