*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अहिराणी कविता*
*बैल जुपेल व्हता*
धाकला व्हता तव्हंय
माय बापना धाक व्हता
गपगुमान चिडीचूप
घरमाच ऱ्हात व्हता
शाया मा जाये
मास्तरना धाक व्हता
गपगुमान छडी खावाले
हात मोऱ्हे देत व्हता
मितर करे चेष्टामस्करी
सुका बोंबील कानाबाना व्हता
खाले मुंडी साधा भोया
सर्वास्ना दबेल व्हता
लगीन करं बायको भेटनी
शेरनी लयेल व्हता
ती सवाशेर हाऊ पावशेर
एक डरकाडी म्हा
शेळी बनेल व्हता
म्हातारा व्हयना
काठी धरी चालत व्हता
पोरे सुना नातनातूस्ले
वंझं व्हयेल व्हता
काय कथन करू
त्यान्या जिंदगानीनी कथा
जीवन जगता जगता
रोजच मरत व्हता
आसं जीवन कोनलेच नको
बैल गाडाले जुपेल व्हता
जिंदगीभर पाणी भरीसन
हेला मरेल व्हता
कवी:-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे.*
७५८८३१८५४३.
८२०८६६७४७७.
