You are currently viewing श्री.सत्यवान यशवंत रेडकर यांचे १९ जुलै रोजी सकाळी बॅरिस्टर खर्डेकर महाविद्यालय येथे निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

श्री.सत्यवान यशवंत रेडकर यांचे १९ जुलै रोजी सकाळी बॅरिस्टर खर्डेकर महाविद्यालय येथे निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

*मालवणचो कट्टो प्रतिष्ठान मुंबई यांचे आयोजन*

वेंगुर्ला :

वेंगुर्ला येथील बॅरिस्टर खर्डेकर महाविद्यालय येथे शनिवार दिनांक १९ जुलै २०२५ रोजी सकाळी ठीक ११.३० वाजता खर्डेकर महाविद्यालयाच्या मुलांसाठी निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान आयोजित केले आहे. यावेळी कोकणाचे सुपुत्र कनिष्ठ अनुवाद अधिकारी मुंबई सीमाशुल्क श्री.सत्यवान यशवंत रेडकर मार्गदर्शन करणार आहेत. या व्याख्यानाचे आयोजन सहकारातून सदाचार हे ब्रीद घेऊन कार्य करणाऱ्या “मालवणचो कट्टो प्रतिष्ठान, मुंबई” यांचे कडून करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्यात दहावी बारावी परीक्षांमध्ये कोकण बोर्ड राज्यात अव्वल असते. परंतु कोकणातील ही मुले पुढे शासकीय अधिकारी म्हणून नावारूपास का येत नाहीत..? असा प्रश्न नेहमीच उपस्थित होतो. खास करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुले भविष्यात शासकीय स्पर्धा परीक्षांना सामोरे जाऊन शासकीय अधिकारी बनून पुढे यावीत हे स्वप्न उराशी बाळगून मुंबई सीमाशुल्क विभागातील कनिष्ठ अनुवाद अधिकारी श्री सत्यवान यशवंत रेडकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान देण्याचा धडाकाच लावला आहे. त्यांच्या या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी कोकणातील मुलांनीच स्थापन केलेली मुंबईस्थित संस्था “मालवणचो कट्टो प्रतिष्ठानने” वेंगुर्ला येथील बॅरिस्टर खर्डेकर महाविद्यालय येथे निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान आयोजित करून खारीचा वाटा उचलला आहे.

या निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानाचा बॅरिस्टर खर्डेकर महाविद्यालयाच्या मुलांनी अवश्य लाभ घ्यावा आणि भविष्यात यशस्वितेकडे एक पाऊल पुढे टाकावे असे आवाहन सहकारातून सदाचार हे ब्रीद घेऊन सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्य करणारी संस्था तथा आयोजक “मालवणचो कट्टो प्रतिष्ठान” मुंबईने केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा