You are currently viewing बांदा केंद्र शाळेत मातांचे पूजन करून साजरी केली अनोखी गुरूपौर्णिमा

बांदा केंद्र शाळेत मातांचे पूजन करून साजरी केली अनोखी गुरूपौर्णिमा

*बांदा केंद्र शाळेत मातांचे पूजन करून साजरी केली अनोखी गुरूपौर्णिमा*

*बांदा*

बांदा येथील पीएम श्री जिल्हा परिषद बांदा नं.१केंद्र शाळेत मातांचे पूजन करून अनोख्या पद्धतीने गुरूपौर्णिमा साजरी करण्यात आली. भारतीय संस्कृती गुरूला अनन्यसाधारण महत्त्व आहे . गुरूपौर्णिमा हा भारतीय परंपरेत एक विशेष दिवस मानला जातो.आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथीला गुरूपौर्णिमा साजरी करण्यात येते.बांदा केंद्र शाळेत ही गुरू पौर्णिमा अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली. या दिवशी विद्यार्थ्यांनी स्वनिर्मित पुष्पगुच्छ व शुभेच्छाकार्ड बनवून शाळेतील शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.या दिवशी पहिलीतील माता पालकांचे पूजन विद्यार्थ्यांनी केले. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून गुरूची महती व्यक्त केली.या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे, ग्रामपंचायत सदस्य रुपाली शिरसाट, ग्रामस्थ माधवी गाड, श्रृती वळंजू व पालक यांनी शाळेत उपस्थित राहून शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.यावेळी ग्रामपंचायत सदस्य रुपाली शिरसाट व श्रृती वळंजू यांनी जीवनातील गुरूचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले.कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक शांताराम असनकर, पदवीधर शिक्षक उदय सावळ ,उपशिक्षक जे.डी.पाटील‌, रंगनाथ परब, फ्रान्सिस फर्नांडिस शुभेच्छा सावंत, स्नेहा घाडी, जागृती धुरी, मनिषा मोरे‌ ,कृपा कांबळे, प्रसन्न जित, सुप्रिया धामापूरकर‌ यांनी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा