You are currently viewing गुरुवर माझे

गुरुवर माझे

*जागतिक साकव्य विकास मंचचे सन्मा सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक, अध्यक्ष कोमसाप सावंतवाडी लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित अप्रतिम गुरुवंदना*

 

*गुरुवर माझे*

(अनलज्वाला वृत्त)

 

अपार ज्यांनी कष्ट वेचले जगा कारणी

कृतज्ञतेने नतमस्तक मी त्यांच्या चरणी ||धृ||

 

जिने शिकवले बोल बोबडे त्या मातेचे

अन् राहू द्या डोईवरती ऋण बापाचे

जाहले जरी नाराज कधी कर मनधरणी

कृतज्ञतेने नतमस्तक मी त्यांच्या चरणी ||१||

 

कितिक सुशिक्षित सुसंस्कृतांचे गुरुजन झाले

शिक्षक बनुनी यशकीर्तीचे मार्ग दावले

अआइईचे वर्ण गिरवले बोट धरूनी

कृतज्ञतेने नतमस्तक मी त्यांच्या चरणी ||२||

 

शाळा शिकलो धन कमावले नि नाव झाले

पण वागावे कसे जगावे..? हे ज्ञान दिले

श्री काडसिद्ध गुरुवर माझे अगाध ज्ञानी

कृतज्ञतेने नतमस्तक मी त्यांच्या चरणी ||३||

 

🖋️दीपक पटेकर (दीपी)

सावंतवाडी

८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा