You are currently viewing मळेवाड कोंडूरे येथील जेरबंद बिबट्याचा अखेर मृत्यू

मळेवाड कोंडूरे येथील जेरबंद बिबट्याचा अखेर मृत्यू

सावंतवाडी :

सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड कोंडुरे येथे एका बिबट्याने हल्ला करत चार ग्रामस्थांना जखमी केले होते. या घटनेची पालकमंत्री नितेश राणे यांनी तात्काळ दखल घेत सदर बिबट्याला जर बंद करण्याच्या सूचना वन अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.त्यालाच अनुसरून २४ तासाच्या आत वनविभागाने जेरबंद केले.सदरच्या बिबट्याला मागील पायाला दुखापत असल्याने त्याच्यावर उपचार करण्यासाठी जेरबंद बिबट्याला सातारा येथील वनविभागच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे नेण्यात आले.सदर बिबट्यावर उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी बिबट्याचा मृत्यू झाला.

अंगातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.बिबट्याच्या हल्ल्यातील जखमींवर गोवा बांबूळ येथे उपचार सुरू असून जखमी मधील आनंद न्हावी व प्रभाकर मुळीक यांना घरी सोडण्यात आले असून पंढरी आजगावकर व सूर्यकांत सावंत यांच्यावर गोवा बांबूळी येथे उपचार सुरू आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा