You are currently viewing दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ रूजू

दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ रूजू

*दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ रूजू*

*पालकमंत्री नितेश राणे यांचे हेल्पलाईन ग्रुपकडून आभार*

दोडामार्ग

दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ डॉ. मसुरकर यांची नियुक्ती करण्यात आली असून डायलीसिस सेंटरही जुलै अखेर सुरु होणार आहे, यामुळे जनता दरबारात मांडलेल्या दोन प्रमुख मागण्या पूर्ण झाल्या आहेत. आज दोडामार्ग हेल्पलाईन पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयाला भेट देवून पाहणी केली. यावेळी आरोग्य सुविधा, नवीन वार्ड निर्मिती आणि रुग्णालय परिसर स्वच्छतेबाबत चर्चा झाली.

या प्रसंगी दोडामार्ग तालुका हेल्पलाईन ग्रुपचे अध्यक्ष वैभव इनामदार, सचिव भूषण सावंत, उपाध्यक्ष शैलेश गावडे, खजिनदार दया गवस, सदस्य मनीषा नाईक, साक्षी नाईक, बाळा गवस, संदेश गवस, मिलिंद नाईक, कृष्णा दळवी, अशोक नाईक, दीपक गवस आणि सामाजिक कार्यकर्ते प्रदीप गावडे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा