You are currently viewing महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था,रत्नागिरी प्रकल्प, येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी…

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था,रत्नागिरी प्रकल्प, येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी…

*महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था,रत्नागिरी प्रकल्प, येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी…..*

रत्नागिरी

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, शिरगाव, रत्नागिरी येथे १० जुलै २०२५ रोजी गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व आश्रम गीताने झाली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत प्रकल्प समन्वयक श्री. स्वप्निल सावंत यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून श्रीमान भागोजी शेठ कीर विधी महाविद्यालय, रत्नागिरी चे प्रभारी प्राचार्य मा. ॲड. डॉ. आशिष बर्वे उपस्थित होते. ॲड. बर्वे यांनी विद्यार्थिनींना गुरुपौर्णिमेबद्दल माहिती दिली व विद्यार्थिनींना गुरु व शिष्य कसा असावा याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी गुरु, अध्यापक, आचार्य, उपाध्याय, पंडित, द्रष्टा महत्त्व समजावून सांगितले त्याचबरोबर काही ऐतिहासिक उदाहरणे देऊन गुरुचे महत्व सांगितले कार्यक्रमासाठी रत्नागिरी प्रकल्पाच्या स्थानिय व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. प्रसन्न दामले उपस्थित होते तसेच बी.सी.ए. कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या स्नेहा कोतवडेकर व नर्सिंग कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या सौ. समिना मुलानी उपस्थित होत्या. तसेच महर्षी कर्वे संस्थेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थिनी ही कार्यक्रमास उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने झाली. याबरोबरीने बी.के.व्ही.टी.आय. रत्नागिरी मारुती मंदिर येथे प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी स्थानीय व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. दीपक जोशी उपस्थित होते. श्री.दीपक जोशी यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त आपले मनोगत व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा